आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CPI (M) च्या संशयित नक्षलवाद्याला पुण्यात अटक, 1990 पासून होता फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: नक्षली कारवायांचे संग्रहित छायाचित्र)
पुणे- केंद्र सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय (एम) या संघटनेच्या दोन संशयित नक्षलवाद्यांना दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)ने अटक केली आहे. पहाटे पावणेसहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथून त्यांना अटक करण्यात आली. आज दुपारी त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले असता सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
के. मुरलीधरन उर्फ अजित उर्फ थॉमस जोसेफ (वय- 62, सध्या रा. लोट्स व्हिला, तुकाराम नगर, तळेगाव दाभाडे, मूळ रा. केरळ), ईस्माईल हमजा सीपी (चिरगपल्ली) उर्फ प्रविण उर्फ जेम्स मॅथ्यू (वय- 29, सध्या रा. लोट्स व्हिला, तुकाराम नगर, तळेगाव दाभाडे, मूळ रा. केरळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची संशयित नक्षलवाद्यांची नावे आहेत.
के. मुरलीधरन याचा गेली 35 वर्षे नक्षलवादी कारवायांमध्ये सहभाग आहे. नक्षलवाद्यांनी घडविलेल्या हत्येमध्ये तो संशयित आरोपी आहे. तो नक्षलवाद्यांच्या दक्षिणेतील कारवायांचे नेतृत्व करतो. केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील कारवायांमध्ये त्याची मुख्य भूमिका आहे. गेल्या 25 वर्षांपासून तो वाँटेड आहे. मुरलीधरन हा 1990 पासून फरार होता. तो पुण्याजवळील तळेगाव परिसरात नाव बदलून राहत होता. मुरलीधरन हा नक्षलवाद्यांचा बडा नेता गणपती याच्या अतिशय जवळचा सहकारी मानला जातो.
बातम्या आणखी आहेत...