आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात क्रेनची 4 वाहनांना धडक, सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू, किवळे परिसरातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड - क्रेनची 4 वाहनांना जोरदार धडक बसून यात सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. किवळे परिसरात आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता ही घटना घडली. निवृत्ती सुतार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील किवळे परिसरात क्रेनने (MH14 M 373) रस्त्यावरील 4 गाड्यांना जोरदार धडक दिली. क्रेनचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात चारही गाड्यांचे मोठे नुकसात झाले आहे. देहूरोड पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले आहे.

सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू...
देहुरोड विकासनगर चौकात क्रेनच्या धडकेत गंभीर जखमी झालेले निवृत्ती सुतार यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... भीषण अपघाताचा व्हिडिओ आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...