आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गार्डियन ईस्टर्न मिडोज’ला क्रिसिलचे रेटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘गार्डियन डेव्हलपर्स’तर्फे खराडी अॅनेक्स येथे विकसित करण्यात येत असलेल्या ‘ईस्टर्न मिडोज’ या गृहप्रकल्पाला ‘क्रेस्ट’ (क्रिसिल रिअल इस्टेट स्टार रेटिंग)  या मूल्यांकन करणाऱ्या संस्थेने नुकतेच फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर केले. 

या गृहप्रकल्पाला प्री-लाँच टप्प्यामध्येच फोर स्टार रेटिंग मिळाले होते. पुणे विभागामध्ये असे रेटिंग मिळविणारा हा पहिलाच गृहप्रकल्प होता. आता रेटिंगमध्ये वाढ झाली आहे. प्रकल्पाचे नियोजन, कार्यक्षम कार्यवाही, आर्थिक स्वयंपूर्णता, कायदेशीर बाबींची पूर्तता, गुणवत्ता आणि नावीन्यपूर्णता या अनेक कसोट्यांवर हे मूल्यांकन करण्यात आले आहे. हे मूल्यांकन या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मिळाले असून प्रकल्पाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. गार्डियन कॉर्पोरेशनचे संचालक उदय जाधव यांनी “क्रिसिल रिअल इस्टेट रेटिंग’चे ज्ञानेश नांदुरकर यांच्याकडून मूल्यांकन प्रमाणपत्र स्वीकारले. 
बातम्या आणखी आहेत...