आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: एकतर्फी प्रेमातून इंजिनिअरींग विद्यार्थ्यांची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- एकतर्फी प्रेमातून एका इंजिनिअरींग विद्यार्थ्यांने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशाल राजाराम सोनवणे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. विशाल आकुर्डीतील एका महाविद्यालयात इंजिनिअरींगच्या तिस-या वर्षात शिकत होता.
विशाल एका मुलीवर प्रेम करीत होता जी त्याची मैत्रिण होती. मात्र, संबंधित मुलगी त्याच्या प्रेमास नकार देत होती. मैत्री कायम ठेवते मात्र प्रेयसी होत नाही या तिच्या वागणुकीमुळे विशाल निराश होता. आपण निवडलेली मुलगी चुकीची असल्याचे त्याला जाणवू लागले व त्यातूनच त्याला मनस्ताप होऊ लागला. अखेर सोमवारी दुपारी विशाल याने राहत्या वसतीगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मैत्रिणीच्या वागणुकीमुळे मनस्ताप झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहले आहे.
विशाल अभ्यासात हुशार होता. त्यामुळे त्याच्या मित्रात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे की यामागे दुसरे काही कारण आहे याचा तपास चिंचवड पोलिस करीत आहे. मंगळवारी विशालचा मृतदेह त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.