आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सोनसाखळी चोरांकडून साडेसहा लाखांचा ऐवज जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पायी जात असलेल्या महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून सोनसाखळी चोरणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सफिर ऊर्फ शब्बीर फिरोज खान-इराणी (रा. लोणावळा, पुणे) हसन सादिक शेखुअली बेग (मु. रा. परळी वैजनाथ, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी लोणावळा येथून पुण्यात येऊन मागील सहा महिन्यात सांगवी, अलंकार, सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ, विश्रांतवाडी, दत्तवाडी, मार्केटयार्ड, वारजे माळवाडी येथे सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली आहे. 12 गुन्ह्यातील चोरीचे मंगळसूत्र साफीर शब्बीर याच्या घरातून त्याच्या परळी वैजनाथ येथील सासरवाडीतून जप्त करण्यात आले आहे.
निगडीमधील टूर्स कंपनीची कर्मचा-याकडून तब्बल 13 लाखांची फसवणूक-

निगडी येथील पॅराडाइज टूर्स एजंट केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने 13 लाख 39 हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कर्मचारी अक्षय संपत पांगारे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय याने ऑक्टोबर 2011 पासून आतापर्यंत ग्राहकांकडून सहलीसाठी पैसे घेऊन रक्कम कार्यालयात जमा करता स्वत:च्या खात्यात वळती केली होती.