आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत: थेरगावमध्ये तिघांचा धुमाकूळ, 11 वाहनांची तोडफोड, एकाला पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथील थेरगांवमध्‍ये पुन्‍हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. येथे तीन जणांनी सोमवारी पहाटे प्रचंड धुमाकूळ घातला. त्‍यामुळे परिसरातील रहिवाश्‍यांमध्‍ये दहशतीचे वातावरण आहे. पुण्‍यातील वाहनांच्‍या तोडफोडीचे सत्र कधी थांबेल हा प्रश्‍न पुन्‍हा समोर आला आहे. या प्रकरणी नवनाथ तुकाराम देवकर याला अटक करण्यात आली आहे, तर त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत.
अकरा गाड्या फोडल्‍या
पोलिसांनी याबाबत माहिती दिली की, थेरगाव येथील कुणाल रेसीडेन्सीजवळ आज सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास देवकर व त्याच्या दोन साथीदारांनी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. त्‍यांनी एकुण 11 गाड्या फोडल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये 3 स्टार बस, 4 ट्रक, 1 सुमो, 2 इंडिका व 1 टेम्पो या वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे.
चालकांनी तोडफोड करणा-या पकडले
ही तोडफोड सुरू असताना काही वाहनांच्‍या चालकांनी तोडफोड करणा-या देवकरला पकडून ठेवले. मात्र त्याचे दोन साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले. देवकर याच्या विरोधात वाकड पोलिस स्‍टेशनमध्‍ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्‍या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, या वाहनांची केली तोडफोड..
वाचा, याच आठवड्यातील घटना, पिंपरी - चिंचवडमध्‍ये 35 वाहनांची तोडफोड