आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवल्यानंतर पाणी अाणण्यावरून वाद, पुण्यात एकाचा खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दारू प्यायल्यानंतर जेवणासाठी बसले असताना, दाेन मित्रांमध्ये पाणी काेण अाणणार यावरून किरकाेळ वाद झाला. मात्र, वाद वाढत जाऊन एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करण्यापर्यंत प्रकरण वाढत गेले. राजू राठाेड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणातील आरोपी व त्याचा मित्र वामन राजपुरे याला पाेलिसांनी अटक केली अाहे.
राजू व वामन हे दाेघेही कचरा वेचण्याचे काम करतात. रविवारी रात्री ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील माेर्शी प्राधिकरणाच्या माेकळ्या मैदानात दारू प्यायल्यानंतर जेवणासाठी बसले हाेते. त्यावेळी दाेघांच्यामध्ये जेवणाच्यावेळी पाणी कोण घेऊन यायचे यावरून वाद झाला. त्यातून दाेघांत हाणामारीही झाली. रागाच्या भरात वामनने राजूच्या डाेक्यात दगड घातला.रक्तस्राव हाेऊन राजूचा जागीच मृत्यू झाला. साेमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस अाल्यानंतर, पाेलिसांनी वामन राजपुरे यास अटक केली. याबाबत भाेसरी एमअायडीसी पाेलिस पुढील तपास करत अाहे.