आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकाच्या हत्येसाठी फ्लॅट,२५ लाखांची ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवडमहानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे (४१) यांच्या हत्येसाठी हल्लेखाेरांना फ्लॅट २५ लाख रुपयांची अाॅफर देण्यात अाल्याची माहिती पाेलिस तपासात समाेर अाली अाहे. याप्रकरणी अाराेपी रमेश लक्ष्मण चव्हाण (३५), सूर्याेदय शेखर शेट्टी (३५), अाकाश अनिल पाेटघन (२०) इंद्रास युवराज पाटील (३८) या अाराेपींना पिंपरी पाेलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

माथाडी कामगार नेता गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनातील अाराेपींना मदत करताे या संशयावरून नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा सप्टेंबर राेजी माेहननगर येथे राहत्या घराजवळ डाेळ्यात मिरची पूड टाकून धारदार शस्त्रांनी वार करून गाेळ्या झाडून निर्घृण खून करण्यात अाला हाेता. याप्रकरणी सुरुवातीला अमाेल वाहिले या अाराेपीस अटक करण्यात अाली हाेती. अमोलचा महापालिकेच्या जागेवरील गाेठा हटविण्यात टेकवडे अग्रेसर असल्याने त्यांचा खून केल्याचे अमोल वाहिले याने कबूल केले हाेते.

मात्र, पाेलिसांनी याबाबत सखाेल तपास केला असता प्रकाश चव्हाण याचा भाऊ रमेश इंद्रास यांनी सरार्इत गुन्हेगार वाहिले यास टेकवडे याच्या खुनाची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले अाहे. या हत्येच्या बदल्यात वाहिलेला फ्लॅट २५ लाख रुपये देण्याचे ठरलेले हाेते. टेकवडे यांच्या हत्येपूर्वी वाहिले शेट्टी सतत संपर्कात असल्याचे तसेच शेट्टी याने अाराेपींना िपस्तूल दिल्याचे तपासात उघडकीस अाले अाहे.