आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीशी ओळख करून न दिल्याने दोन तरुणांना बेदम मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पुणे - मैत्रिणीशी ओळख करून न दिल्याने तिघांनी दोन तरुणांसह त्यांच्या मैत्रिणींना मारहाण केल्याची घटना पुण्यातील मुंढवा येथे रविवारी उघडकीस आली.   
 
याप्रकरणी प्रणव दातार, अमोघ रानडे, गुरुबिरसिंग लांबा यांना अटक  करण्यात आली आहे. याबाबत शंतनू रॉय आणि पार्थ व्यास यांनी पाेलिसांत   तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री पार्थ आणि शंतनू आपल्या दोन मैत्रिणींसह मुंढवा येथील लोकल गॅस्ट्रो बारमध्ये जेवणासाठी गेले होते. या वेळी तिघांनी दोघांना मैत्रिणींशी ओळख करून देण्याची मागणी करत त्यांना दारू पिण्याचा आग्रह केला. मात्र, दोघांनी त्यांना नकार नकार देत तरुणींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हॉटेलच्या बाहेर निघाल्यानंतर रात्री दीडच्या सुमारास तिघांनी शंतनू, पार्थ यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या त्यांच्या मैत्रिणींनाही त्यांनी मारहाण केली. काही नागरिकांनी  हे भांडण साेडवले. दरम्यान, हा प्रकार रस्त्यावरील काही नागरिकांनी मोबाइलमध्ये चित्रीत केला. त्यानंतर याबाबतची क्लिप व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
बातम्या आणखी आहेत...