आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे फाडून महिलेला केली मारहाण; बारामती तालुक्यातील प्रकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - रेशन दुकानदार व त्याच्या साथीदाराने शरीरसुखाची मागणी फेटाळणार्‍या महिलेचे भररस्त्यात कपडे फाडले. तसेच तिच्यासह मुलाला शिवीगाळ व मारहाणही केल्याची धक्कादायक घटना सुपे (ता.बारामती) येथे घडली. पोलिसांनीही तिची तक्रार ऐकली नाही. वरिष्ठांकडे गेल्यानंतर 15 दिवसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

पीडित महिला आई, वडील व आपल्या मुलासह सुपे येथे राहते. तिच्या शेजारी राहणारा रेशन दुकानदार मल्हारी सकट व त्याच्या साथीदाराने 12 फेब्रुवारी रोजी तिचे कपडे

फाडून मारहाण करत तिचा विनयभंग केला. तिच्या मुलालाही मारहाण केली. महिला पोलिसांकडे गेली. मात्र, लिहून आणलेला तक्रार अर्ज फेटाळत पोलिसांनी सोयीची तक्रार लिहून घेत तिला दमदाटी केली. या महिलेने गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. नंतर महिलेने पोलिस उपाधिक्षक संभाजी कदम यांच्याकडे धाव घेतल्यानंतर मात्र पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. घटनेच्या 15 दिवसानंतर पोलिसांनी मल्हारी संभू सकट (वय 65), शंकर मल्हारी सकट (वय, 32), किरण नरेंद्र सकट (अल्पवयीन), नरेंद्र मल्हारी सकट (वय 35) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून मल्हारी सकटला अटक केली, इतर तीन आरोपी मात्र मोकाट आहेत. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.