आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकर संपत्ती मिळवण्यासाठी दत्तकपुत्राने केला पित्याचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - संपत्ती लवकर मिळण्यासाठी दत्तकपुत्राने पित्याचा खून केल्याचा प्रकार बारामती येथे घडला. अंजनगाव येथील आनंदराव भिकाजी परकाळे (80) यांचा अमित अनिल परकाळे याने खून केला. आनंदराव यांनी दत्तक घेतलेला अमित हा त्यांच्या सख्ख्या पुतण्याचा मुलगा होता.

आनंदराव यांना मूळबाळ नसल्याने त्यांनी अमित अनिल परकाळे याला दत्तक घेतले होते. अनिल हा आनंदराव यांच्या सख्ख्या पुतण्याचाच (इनल बळवंत परकाळे) मुलगा होता. आनंदराव यांची सुमारे एक कोटीची संपत्ती वारसाहक्काने लवकर आपल्याला मिळावी यासाठी अमित आणि त्याचे खरे वडील अनिल यांनी शुक्रवारी (दि.20) पहाटे आनंदरावांचा गळा कापून खून केला. नंतर दवाखान्यात नेण्याचे नाटक करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण शेजार्‍यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. पोलिसांनी अनिल व अमितला अटक केली. न्यायालयाने त्यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

एक कोटीची संपत्ती
10 एकर जमीन, 22 लाख रुपये किमतीचा फलटण येथील बंगला, तसेच फंडाची रक्कम अशी सुमारे 1 कोटी रुपयांची संपत्ती आनंदरावांकडे होती.