आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही सीरीयल ‘क्राइम पेट्राेल’ मधील अभिनेत्री कारस्थानी; पूजा जाधवसह तिघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रमुख आरोपी पूजा जाधव - Divya Marathi
प्रमुख आरोपी पूजा जाधव
पुणे - ‘क्राइम पेट्राेल’ मालिकेत पाेलिसाची भूमिका करणारी अभिनेत्री पूजा जाधव ही स्वत:वर बलात्कार झाल्याची तक्रार देण्यासाठी पाेलिस ठाण्यात दाखल झाली. मात्र, चाैकशीत तिचे हे कटकारस्थान उघडकीस अाले. या प्रकरणी भाेसरी पाेलिसांनी जाधव हिच्यासह तीन जणांविराेधात गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठाेकल्या अाहेत.   
 
पूजा जाधव हिने काही दिवसांपूर्वी एका धनदांडग्या बिल्डरला अापल्या जाळ्यात अाेढून त्याच्याशी लगट केली. त्यानंतर बलात्काराच्या अाराेपाची धमकी देऊन तिने बिल्डरकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. मात्र, सततच्या त्रासाने वैतागलेल्या बिल्डरने  थेट पाेलिस ठाणे गाठून अापली व्यथा मांडली.  पाेलिस निरीक्षक अजय भाेसले हे पूर्वी वाकड पाेलिस ठाण्यात कार्यरत असतानाच पूजा जाधव हिने अशाच प्रकारे तक्रार पाेलिस ठाण्यात अाणली हाेती. त्यामुळे भाेसले यांना पूजा जाधव हिचा बनाव लक्षात अाला अाणि चाैकशीत तिचे बिंग फुटले. त्यानंतर पाेलिसांनी पूजा जाधव हिच्यासह माया सावंत, रवींद्र सिरसाम  या दाेन तिच्या साथीदारांनाही अटक केली.   
 
हे तिघे अन्य दाेन महिलांच्या साथीने माेठे व्यावसायिक, धनदांडगे यांना प्रेमाचे, लग्नाचे अामिष दाखवून त्यांना जाळ्यात अाेढायचे त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करायचे. पूजाचे साथीदार सामाजिक कार्यकर्ते असल्याचे भासवून धनदांडग्यांना धमक्या देऊन प्रकरण मिटविण्यासाठी पैसे उकळत हाेते. याअाधी ही पूजा हिने काही बडे ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, हाॅटेल मालक, इंजिनिअर्स अशा व्यक्तींना लुटल्याची प्रकरणे असून त्याबाबत पाेलिस सखाेल चाैकशी करत अाहेत.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... क्राईम पेट्रोलमध्ये पूजाने साकारली महिला पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका...
बातम्या आणखी आहेत...