आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचे अनैतिक संबध असल्याने पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, काँग्रेस नेत्यावर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पत्नीचे अनैतिक संबध असल्याने समाजात बदनामी होत असल्याने पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस विनय ढेरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय ढेरे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या दोघांच्या वर्तणुकीचा या महिलेचा पती आणि त्यांच्या मुलींना त्रास होत होता. यावरून त्यांची सतत भांडणे होत. या सगळ्याला कंटाळून या महिलेच्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने तो बचावला. पोलिसांनी सोमवारी सकाळी विनय ढेरे याला पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली. संबंधित महिलेलाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता 506 आणि 511 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...