आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime Suspension Not Mean Criminal Mumbai High Court

गुन्हे प्रलंबित असणे म्हणजे सराईत गुन्हेगार नव्हे - मुंबई उच्च न्यायालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - एखाद्या आरोपीविरोधात केवळ अनेक गुन्हे प्रलंबित आहेत म्हणून त्याला सराईत गुन्हेगार ठरवून नये, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पिंपरीच्या सराफ व्यावसायिकाविरोधात चोरीचे दागिने घेतल्याचा आरोप होता. या सराफाविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे प्रलंबित होते.
त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतरही तो गुन्हे करतच होता. गुन्ह्यातील सातत्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यामुळे
व्यावसायिकाने आपल्याला इतर गुन्ह्यांतून वगळण्यात यावे, असा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी.ढवळे यांच्याकडे केला. परंतु सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याची सुनावणी न्यायमूर्ती एम.एल.ताहिलानी यांच्यासमोर झाली.
एखाद्या आरोपीविरोधात एकाच कलमाखाली विविध गुन्हे जरी दाखल झाले असले तरी त्याला सराईत असे संबोधता येणार नाही, तर आरोपीला किमान तीन गुन्ह्यांत शिक्षा होणे क्रमप्राप्त आहे. केवळ प्रलंबित गुन्हे याचा अर्थ तो सराईत असा निष्कर्ष काढता येणार नाही, असा युक्तिवाद अॅड.गिरमे यांनी केला. न्यायमूर्तींनी हा युक्तिवाद मान्य करत व्यावसायिकाची आरोपातून मुक्तता केली.