आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: कुख्यात गुंड अप्पा लोंढे याची गोळ्या घालून हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कुख्यात गुंड व पुणे जिल्ह्यात वाळू माफिया म्हणून पुढे आलेल्या अप्पा ऊर्फ प्रकाश लोंढे याची आज सकाळी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून व धारदार शस्त्रानी भोकसून हत्या करण्यात आली. ही घटना उरुळीकांचनजवळील सिंधवने रोडवर आज पहाटे सकाळी साडेपाच- सहाच्या सुमारास घडली. मॉर्निग वॉकला जात असताना दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी अप्पा लोंढेचा गेम केला.
लोंढेवर हल्ला करून हल्लेखोर लागलीच पसार झाले. त्यानंतर लोंढेच्या नातेवाईकांनी त्याला तत्काळ हडपसरमधील नोबेल रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वी मृत घोषित केले. घटनास्थळावर तणावाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अप्पा लोंढेवर पुणे जिल्ह्यासह चार-पाच जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल होते. मागील काही दिवसापासून तो वाळू माफिया म्हणून पुणे व परिसरात कुप्रसिद्ध झाला होता. उरळी कांचन व लोणी काळभोर परिसरात त्याने गुंडगिरीतून उच्छाद मांडला होता. दरम्यान, अप्पा लोंढेची हत्या कोणी व का केली याबाबत अद्याप काहीही माहिती पुढे आली नाही.
बातम्या आणखी आहेत...