आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृप्ती देसाईना अद्याप अटक नाही; माध्यमांसमोर येतात पण पोलिसांना सापडत नाहीत!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि त्यांच्या पती विरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेला तब्बल 6 दिवस उलटले असून देखील पोलिसांना तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीसह अन्य कोणत्याही आरोपीला ताब्यात घेण्यात यश आलेले नाही. त्यामुळे हिंजवडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

माध्यमांना प्रतिक्रिया द्यायला उपलब्ध होणाऱ्या तृप्ती देसाई मात्र पोलिसांना कशा सापडत नाहीत. की पोलिसांना त्यांना अटकच करायची नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  
विजय अण्णा मकासरे यांनी मारहाण आणि पैशाची मागणी केल्याप्रकरणी तृप्ती देसाई आणि त्यांचे पतीसह अन्य 4 जणांविरुद्ध तक्रार करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती देसाई आणि इतर चौघांवर अॅट्रॉसिटी, रस्ता अडवणे, माराहाण करणे, धमकी देणे असे गंभीर आरोप आहेत. मात्र गुन्हा नोंदविल्याच्या 6 दिवसानंतरही पोलिसांना तृप्ती देसाईंचा यांचा सुगावा लागला नाही. सामान्य नागरिकांवर पोलिसांची कारवाई तात्काळ होते मात्र अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावाखाली पोलिस प्रशासन आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र दुसरीकडे हिंजवडी पोलिस तपास सुरु असल्याचे सांगत आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 पथक तयार करण्यात आले आहेत, लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती हिंजवडी पोलीस निरीक्षक अरुण वाईकर यांनी दिली आहे.  
नेहमीच कायद्याची भाषा करणाऱ्या तृप्ती देसाई यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होऊन सुद्धा चौकशीसाठी त्या स्वतः समोर का येत नाहीत असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणात अद्याप तृप्ती देसाई आणि त्यांचे अन्य सहकारी चौकशीसाठी समोर येत नसल्याने या प्रकरणात नक्कीच काहीतरी गौडबंगाल असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नेत्यांसाठी वेगळा आणि सामान्य नागरिकांनसाठी वेगळा कायदा तर नाही ना?

पुढील स्लाइडवर वाचा काय आहे हे प्रकरण?
बातम्या आणखी आहेत...