आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Criminal Gang Attack On Youth, Brekags Some Vehicles

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: थेरगावात टोळक्याचा धुडगूस; एकावर हल्ला, वाहनांचीही तोडफोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगावमधील लक्ष्मणनगर परिसरात 10-15 जणांच्या सशस्त्र गुंडाच्या टोळक्याने पुन्हा धूडगूस घातला. ज्याच्यावर हल्ला करायचा होता ते न सापडल्याने या टोळक्याने त्याच्या मित्रावरच हल्ला केला. तसेच तो न मिळाल्याने जाताना तेथील 10-12 वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
संदीप पवार (26, लक्ष्मणनगर, थेरगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोहित गायकवाड, अश्रफ इनामदार (रा. पवारनगर, थेरगाव) यांच्यासह त्यांच्या इतर 10-12 साथीदारांविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पवारचा मित्र (नाव माहित नाही) आणि रोहित गायकवाड यांच्यात मागील तीन-चार दिवसात वाद झाला होता. याच वादातून रोहित आपल्या साथीदारांसह लक्ष्मणनगर भागात संदीपच्या मित्राला मारण्यासाठी गेला होता. मात्र, संदीपचा मित्र तेथे आढळून न आल्याने रोहित व त्याचे सहकारी चिडले. आपल्याला ज्याच्यावर हल्ला करायचा आहे तो येथे न सापडल्याने रोहितने चिडून त्याचा मित्र संदीपवरच तलवारीने हल्ला केला. यात संदीपच्या चेह-यावर व खांदयावर वार केले. त्यानंतर टोळक्याने तेथील रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या 10-12 वाहनांची तोडफोड केली व तेथून निघून गेले.
दरम्यान, जखमी संदीपवर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. रोहित गायकवाड व अश्रफ इनामदार हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहे.