आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवडमधील सराईत गुन्हेगाराची फलटणमध्ये दगडाने ठेचून हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवड च्या काळेवाडी परिसरातील  सराईत गुन्हेगाराला फलटण येथे घेऊन जावून बरडगावच्या हद्दीत चार जणांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  याप्रकरणी फलटण पोलिस ठाण्यात चारजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सचिन ठाकूर (19, काळेवाडी) असे हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रंकरणी वैभव नागस्कर, प्रशांत दिगे, संतोष उर्फ बंड्या सगर, प्रकाश हिराचंद ओंबासे (रा. राहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सूत्रांनुसार, प्रकाश ओंबासे याची फलटण कोर्टात तारीख होती. सचिन ठाकूर व अन्य साथिदार प्रकाश बरोबर गेले होते. बरड गावच्या हद्दीत गेल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. चारजणांनी सचिनच्या डोक्यात दगड घालून निर्घुन हत्या केली. त्यानंतर चारहीजण फरार झाले. सोमवारी रात्री सातारा गुन्हेशाखेचे पोलिस काळेवाडी, राहाटणी येथे चौकशीसाठी आले होते.

 

पिंपरी-चिंचवडमध्ये सचिनच्या विरोधात 17 गुन्हे
सचिन ठाकूर याच्या विरोधात 17 गुन्हे दाखल असून त्यामध्ये दोन हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. चारजणांनी सचिनची हत्या का केली. याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोपींचा शोध फलटणचे पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...