आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहोळ टोळीच्या गुंडाची डोक्यात दगड घालून पुण्यात हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कुख्यात गुंड शरद मोहोळ टोळीशी संबंधित असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. बडेखान दावक शेख (25) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल पानसरे, गौरव जाधव, मयूर धुमाळ, नवनाथ ऊर्फ ढोम्या सोनार व एका अनोळखी व्यक्तीविरोधात कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नागेश दत्तात्र्य तनपुरे यांनी तक्रार दाखल केली आहे. नागेश तनपुरे व बडेखान शेख हे दोघे शुक्रवारी रात्री कोथरुड परिसरातील जय श्रीराम तरुण मंडळाजवळ आले होते. त्यावेळी पाच जण तेथे आले व त्यांनी बडेखान याच्याकडे पैसै कधी देतो अशी विचारण करत त्याच्यावर तलवारीने वार करून डोक्यात दगड घालून ठार केले.