आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्याजवळील अांबू डाेंगरात लपलेल्या दाेन कुख्यात गुंडांचे एन्काउंटर, ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी, तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्येसह अनेक गुन्ह्यात पाेलिसांना वांॅटेड असलेला कुख्यात गुंड श्याम दाभाडे व त्याचा साथीदार धनंजय प्रकाश शिंदे हे दाेघे मंगळवारी सकाळी पाेलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. चाकणजवळील अांबू डाेंगर परिसरात लपलेल्या या अाराेपींना पकडण्यासाठी गेलेल्या पाेलिसांवर त्यांनी गाेळीबार केला. प्रत्त्युत्तरात पाेलिसांनी केलेल्या गाेळीबारात दाभाडे व शिंदे यांचा मृत्यू झाला. या अाराेपींजवळून दाेन देशी कट्टे, चार गावठी पिस्टल, ४४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात अाली.

शेट्टी हत्येप्रकरणी दाभाडेला अटक करण्यात अाली हाेती. मात्र कालांतराने तुरुंगातून बाहेर अाल्यानंतरही त्याची दहशत कमी झालेली नव्हती. तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा त्याने साथीदारांसह १६ अाॅक्टाेबर राेजी सकाळी ११ वाजता गाेळ्या घालून, काेयत्याने वार करून भररस्त्यात खून केला हाेता. या प्रकरणातील २२पैकी १५ अाराेपींना पाेलिसांनी यापूर्वीच अटक केली हाेती. श्याम मात्र इतर साथीदारांसह फरार हाेता, पाेलिस त्याचा शाेध घेत हाेते.
दाभाडे व शिंदे चाकण परिसरातील अांबू डाेंगरावर लपल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस िनरीक्षक राम जाधव यांना मिळाली हाेती. त्यानुसार त्यांच्या पथकाने साेमवारी मध्यरात्रीपासूनच जंगलात शाेधमाेहीम सुरू केली. मंगळवारी सकाळी अाठ वाजता अांबू डाेंगरावरील पवनचक्कीजवळ एका तंबूत हे दाेन्ही अाराेपी अाश्रयास असल्याचे पाेलिसांना दिसले. पाेलिसांनी त्यांना शरण येण्याचे अावाहन केले. मात्र त्याला प्रतिसाद न देता दाभाडे व शिंदे यांनी गावठी कट्ट्यातून पाेलिसांच्या दिशेने बेछूट गाेळीबार सुरू केला. त्या वेळी स्वरक्षणार्थ पाेलिस िनरीक्षक राम जाधव व सहायक पाेलिस िनरीक्षक सतीश हाेडगर यांनीही अाराेपींच्या दिशेने दाेन व तीन राउंड फायर केले. यात जखमी हाेऊन दाेन्ही अाराेपी खाली पडले. पाेलिसांनी त्यांना तातडीने चाकणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घाेषित केले. शिंदे यांच्या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे राजेश रामाघरे, विनाेद घाेळवे, पाेलिस उपनिरीक्षक अंकुश माने व पाेलिस कर्मचारी विजय पाटील, िकरण अारुटे, विशाल साळुंखे, चंद्रकांत वाघ, सचिन माेरे हे पाेलिस कर्मचारीही सहभागी हाेते.
शाम दाभाडेवर हत्येचे ३, हत्येच्या प्रयत्नाचे ३ गुन्हे
- सचिन शेळके यांच्या हत्येसह शाम दाभाडेवर 3 हत्येचे गुन्हे, 3 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे, तसेच खंडणी आणि दरोडा असे एकूण 22 गुन्हे होते.
- पुण्यासह राज्यातील अनेक शहरात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तळेगाव, मावळ परिसरात शाम दाभाडेची प्रचंड दहशत होती.
पुढे वाचा... चाकण- तळेगाव एमअायडीसीत दाभाडेची दहशत
बातम्या आणखी आहेत...