आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौजमजेसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या 2 टोळ्या गजाआड, 16 गुन्हे उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मौजमजेसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या 2 टोळ्या गजाआड करण्यात आल्या आहेत. चिंचवड पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.या 2 टोळ्यांकडून आतापर्यंत 16 गुन्हे उघडकीस आले आहेत. एकूण 19 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात 20 तोळे सोने, 6 दुचाकी, 3 मोबाईल, रोख 57 हजार रुपयांचा समावेश आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नितीन हरी वेताळ (वय 18, रा.पुणे पर्वती) आणि आकाश विठ्ठल जगताप (वय 18, रा.निगडी) हे दोघे दळवी नगर येथून दुचाकीवरून जात असताना गस्त घालत असलेल्या चिंचवड पोलिसांना या दोघांवर संशय आला आणि त्यांना थांबवून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली.मात्र दुचाकीच चोरीची असल्याने त्यांच्यावर संशय बळावला दोघांना अटक करण्यात आली.अधिक तपास केला असता ते मौज मजेसाठी घरफोडी आणि वाहनचोरी करत असल्याचे निष्पन्न झाले.त्यांच्याकडे 1,एलइडी टीव्ही,आणि लॅपटॉप.10 ग्रॅम सोन्याची अंगठी,1 मोबाईल,5 दुचाकी,असा 2 लाख 58 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.तसेच 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.
 
 
दुसऱ्या घटनेत चिंचवड पोलिस गस्त घालत असताना वाल्हेकरवाडी येथे गणेश दगडू (वय वर्ष 24 रा.मुळशी)दिलीप शिकरे (वय19, रा.कामशेत) आणि रोहिदास पवार (वय वर्ष 24 रा.शिवणे,पुणे) हे तीन इसम संशयित आढळले मात्र पोलिसांना पाहून त्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. पुढे काही अंतरावर त्यांना पकडले.त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचा संशय पोलिसांना आला त्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून आणखी एकाचे नाव समोर प्रमोद शिरसागर (वय 36, रा.लोणावळा) अस या आरोपीचे नाव आहे.या सर्वांकडे अधिक तपास केला असता त्यांनी घरफोडी आणि वाहनचोरी केल्याची कबुली दिली.यांच्याकडून 19 तोळे सोनं,चांदीचे दागिने,1 फियाट पुंटो कार,रोख रक्कम 57 हजार रुपये,1 दुचाकी,2 मोबाईल,असा 16 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.त्यांच्याकडून घरफोडीचे 08,वाहन चोरीचा 1,आणि मोबाईल चोरीचा 1असे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.ही कारवाई पोलिसनिरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश कांबळे,पोलीस उपनिरीक्षक डिगे यांनी केली.करण्यात आला.त्यांच्याकडून घरफोडीचे 08,वाहन चोरीचा 1,आणि मोबाईल चोरीचा 1असे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.ही कारवाई पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मर्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश कांबळे,पोलिस उपनिरीक्षक डिगे यांनी केली.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...