आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार वापसीऐवजी लेखणीचे हत्यार वापरा- विनोद तावडेंचा साहित्यिकांना चिमटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लेखकांच्यालेखणीत, प्रतिभेत ऊर्जा असते. ती लेखणी आणि ऊर्जा लेखकांनी हत्यारासारखी वापरावी आणि समाजाला मार्गदर्शन करावे. पुरस्कार परत करणे हा मार्ग योग्य नव्हे, असा सल्ला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे दिला. पिंपरी येथे होणाऱ्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे तसेच अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
देशभरात सध्या लेखकांनी पुरस्कार वापसी सुरू केली आहे. त्यासंदर्भात तावडे म्हणाले, 'लेखकांनी लेखणीच्या मार्गाने समाजातील चुकीचे वातावरण बदलावे. ते सामर्थ्य त्यांचेच आहे. त्यांनी हे ओळखावे आणि वापरावे. पुरस्कार परत करणे हा मार्ग नाही.' तावडेंनी पुण्यातील समारंभात राज्य शासनाच्या दोन महत्त्वपूर्ण पुरस्कारांची घोषणा केली. मात्र, ती केल्यावर 'सध्या कुठलाही पुरस्कार जाहीर करताना भीती वाटते,' असे ते म्हणताच सभागृहात हशा पिकला.
तावडे म्हणाले, मराठीमध्ये अनेक चांगले साहित्य आहे. मात्र, हे साहित्य भाषांतरित होत नाही. प्रत्येक महापालिकेने साहित्यिक रसिकांना जागा उपलब्ध करुन द्यायला हवी. साहित्य चळवळीच्या वाढीसाठी गाव तेथे ग्रंथालय ही योजना सरकार राबवित आहे. त्याचा पहिला प्रयत्न म्हणून महाबळेश्वर येथील पाचगणीच्या इथे भिलारगावात पाच लाख पुस्तक देऊन त्याठिकाणी ग्रंथालय उभे करण्यात येणार आहे. याठिकाणी दर शनिवारी व रविवारी साहित्यिक आपल्या विचारांची देवाणघेवाण करु शकतील अशी योजना आहे. त्यास प्रतिसाद मिळाला तर सर्वच ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...