आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाॅनलाइन पाकीटमारीत काेटींचा गंडा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पूर्वी गर्दीच्या ठिकाणी पाकिटमारांना पकडण्यासाठी पाेलिसांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, बदलत्या काळानुसार पाकिटमारीची संकल्पना बदलत असून अाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चाेरटे केवळ इंटरनेटच्या माध्यमातून अनेक नागरिकांचे खिसे कापत अाहेत. काेट्यवधींचा गंडा घालणाऱ्या या भामट्यांवर कारवाईसाठी पाेलिसांना कसरत करावी लागत अाहे.

सांस्कृतिक शहर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात चालू वर्षभरात नाेकरीच्या अामिषाने सुमारे ७ काेंटीची फसवणूक, अाॅनलाइन व्यवसायाच्या बहाण्याने ६ काेटी, क्रेडिट कार्डचा वापर करून ४ काेटी, विविध कंपन्यांचे, व्यवसायिकांचे र्इमेल हॅक करून ४ काेटींची, लग्न करण्याच्या बहाण्याने, परदेशातून पाठवलेले गिफ्ट कस्टम विभागातून साेडवण्याचे नाटक करून अडीच काेटी रुपयांची, माेठ्या रकमेची लाॅटरी लागल्याचे भासवून एक काेटी रुपयांची राेख तर विम्याच्या बहाण्याने सुमारे पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात अाल्याचे प्रकार घडले अाहेत. चाेरी, दराेडा, खंडणी, घरफाेडी असे गुन्हे करून पाेलिसांच्या रडारवर येण्यापेक्षा अापली अाेळख लपवून अाॅनलाइन पद्धतीने भामटे काेट्यवधींचा गंडा घालत असल्याचे सदर अाकडेवारीवरून स्पष्ट हाेत अाहे. अशा भामट्यांचा शाेध घेऊन त्यांना गजाअाड करण्यासाठी पाेलिसांना प्रत्येक गुन्ह्याचा सातत्याने पाठपुरावा करावा लागत असल्याने आरोपींना पकडण्याचे प्रमाणही अत्यल्प अाहे.

नवी दिल्ली, नाेएडा, उत्तर प्रदेश, मुंबर्इ अशा ठिकाणी बीपीअाे कंपन्या निर्माण करून त्या माध्यमातून वेगवेगळ्या नागरिकांशी संपर्क साधला जाताे. त्यानंतर जे नागरिक याेजनांना बळी पडतील अशांचा विश्वास संपादन करून त्यांना विविध बँक खात्यावर रक्कम भरण्यास भाग पाडले जाते. त्यासाठी भावनिक अथवा व्यवसायिक ब्लॅकमेलिंगही भामट्यांडून केले जाते एकदा बँकेत पैसे जमा केले की, त्यानंतर त्यांच्याशी संपर्क ताेडला जाऊन सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यात येते. अशा सायबर गुन्ह्यांना अाळा घालण्यासाठी पाेलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

अार्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा
नागरिकांनी अाॅनलाइन अार्थिक व्यवहार करताना समाेरच्या व्यक्तीची, कंपनीची, संस्थेची खातरजमा करूनच अार्थिक व्यवहार केला पाहिजे. सायबर गुन्हेगार खाेटी नावे वापरून बनावट बँक खात्याचा वापर करतात. तसेच आरोपी हे देश किंवा परदेशातून व्यवहार करत असल्याने सायबर गुन्ह्यांना नागरिकांनी बळी पडू नये. - सुनील पवार, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, सायबर सेल
बातम्या आणखी आहेत...