आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांचे पुण्यात निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आस्वादक आणि सर्जनशील समीक्षेने मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक व ८३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय भिकाजी उर्फ द. भि. कुलकर्णी (वय ८२) यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा व नात असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पिंपरी येथील मराठी साहित्य संमेलनात १५ जानेवारी रोजी माजी संमेलनाध्यक्ष म्हणून दभिंचा सत्कार झाला होता. तोच त्यांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला.
१८ जानेवारीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि २७ जानेवारीला सकाळी ११ च्या सुमारास त्यांचे निधन झाले. सुमारे ५० वर्षे दभिंनी अध्यापनाचे कार्य केले. समीक्षेसह स्वतंत्र लेखनाची त्यांची ग्रंथसंपदा ४० हून अधिक आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. न. म. जोशी, नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, डॉ. पी. डी. पाटील, ह. मो. मराठे, प्रकाशक अरुण जाखडे, देवयानी अभ्यंकर, ह. ल. निपुणगे आदींनी दभिंचे अंत्यदर्शन घेतले.