आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dabholkar Killer Free, Say Chief Minister In Pune

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोलकरांची हत्या करणारे तपासापासून लांबच, मुख्‍यमंत्र्यांचा पुण्‍यात खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘डॉ. दाभोलकरांच्या हत्येबद्दलची ताजी माहिती म्हणजे गुन्हेगारांचा तपास अजून लागलेला नाही. पोलिसांनी 19 पथके स्थापन केली आहेत. कसोशीने तपास सुरु आहे. मात्र अजून ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत,’ असा खुलासा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केला.


हत्येला पाच दिवस उलटून गेल्यानंतरही पुणे आणि मुंबईच्या पोलिसांना कोणतेच ठोस धागेदोरे मिळाले नसल्याची स्पष्ट कबुली चव्हाण यांनी दिली. डॉ. दाभोलकर यांची हत्या धर्मांध शक्तींनी केल्याचे मी म्हणालो नव्हतो. ज्या प्रवृत्तींनी 1948 मध्ये हत्याकांड घडवले त्याच प्रवृत्तींनी ही हत्या केली असावी, असे मी म्हणालो होतो. त्यामुळेच डॉ. दाभोलकरांचे नुसते मारेकरी सापडून उपयोग नाही. यामागचे सूत्रधार शोधणे महत्त्वाचे आहे. हा अत्यंत पूर्वनियोजीत कट होता. त्यामुळे या तपासाची तुलना मुंबईतील गँगरेपशी करता येणार नाही, असे चव्हाण म्हणाले.