आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातनच्या दाेघांची ‘बीईअाेएस’ चाचणी, दाभोलकर हत्‍या प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - डाॅ.नरेंद्र दाभाेलकर हत्या प्रकरणात तपासासाठी सीबीअायने सनातनच्या पुण्यातील दाेन साधकांच्या ‘ब्रेन इलेक्ट्रिकल अाॅस्लिशन’ चाचणी घेण्याची परवानगी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांच्या न्यायालयाने दिली. हेमंत शिंदे व नीलेश मधुकर शिंदे अशी त्यांची नावे आहेत.
यापूर्वी फेब्रुवारीत त्यांच्या ‘पाॅलिग्राफ’ चाचणीची परवानगी देण्यात आली होती. प्रकरणात विविध जणांचे जबाब नाेंदवत असताना नीलेश व हेमंत शिंदे यांचे जबाब असमाधानकारक अाढळले हाेते. मुंबईतील कलिना येथील सेंट्रल फाॅरेन्सिक सायन्स लॅबाेरेटरीत बीईअाेएस चाचणी होईल. चाचणी काेणत्या दिवशी, किती वाजता होईल, याची माहिती दाेघांना ४ िदवसांआधी देण्यात यावी, असे काेर्टाचे निर्देश आहेत.