आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dabholkar Murder Managed, Pune Police Commisssioner First Time Accept

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोलकरांची हत्या सुपारी देऊनच, पुणे पोलिस आयुक्तांची प्रथमच कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांनी खून करताना खबरदारी पाळली असून कोणतेही पुरावे सोडलेले नाहीत. गुन्हा करताना हल्लेखोरांनी सकाळची वेळ, तुरळक गर्दी, पळून जाण्यासाठी अनेक पर्यायी रस्ते व बंदुकीचे ज्ञान या गोष्टींचा बारकाईने विचार केला आहे. या गुन्ह्याची पद्धत, व्याप्ती व खबरदारी पाहता ही हत्या सुपारी देऊनच झाल्याचे समोर येत आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त गुलाब पोळ यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
पोळ म्हणाले, डॉ. दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जादूटोणा व जात पंचायतीविरोधी जनजागृती या माध्यमातून चुकीच्या प्रथा बंद करण्याच्या प्रयत्नात होते. ते कधी आक्रमकतेने बोलत नव्हते, त्यामुळे त्यांचे कोणाशी वाद नव्हते. त्यांची हत्या करण्यामागचा उद्देश हा त्यांच्या कामाला विरोध असणा-या शक्ती व व्यक्तींकडून झालेला असेल. घटनास्थळी आढळलेली काडतुसे व पुंगळ्या रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या आहेत, परंतु सदर काडतुसे ही इतर कोणत्या गुन्ह्याशी साधर्म्य साधतात का? याची ही पोलिस चौकशी करत आहे, परंतु अद्याप पोलिसांना कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. आरोपीच्या शोधासाठी पथकांची संख्या 19 वरून 23 करण्यात आली आहे.


खबरे, गुन्हेगारांकडून माहितीची जमवाजमव
येरवडा, तळोजा व इतर काही ठिकाणच्या कारागृहात हल्लेखोरांबाबत चौकशी केली आहे. गंभीर गुन्हे करून सुटलेले आरोपी व जामिनावर आलेले आरोपी यांच्याकडेही पोलिसांनी चौकशी केली आहे.


मुंबईहून पाठलाग झाला नाही
हत्येच्या आदल्यादिवशी दाभोलकर मुंबईवरून रात्री पावणेदोनच्या सुमारास पुण्यातील सिमला ऑफीस चौकीत उतरून रिक्षाने घरी आले. ही बाब पोलिसांनी सिमला ऑफिस चौकातील सीसीटीव्हीत आढळून आली आहे. मात्र, ट्रॅव्हल व रिक्षाचालकाची चौकशी केली असता त्यांच्यावर कोणी रात्री पाळत ठेवली असल्याचे पुढे आले आहे. डॉ. दाभोलकर राहत असलेल्या ठिकाणचे हॉटेल, लॉजेस, रिक्षाचालक यांची पोलिसांनी चौकशी केली मात्र त्यात काही निष्पन्न झालेले नसल्याचे पोळ म्हणाले.


आजपर्यंतचा तपास
* राज्यातील 700 गुन्हेगारांसह 1500 जणांची चौकशी
* 7756 नंबर असलेल्या 74 दुचाकींची तपासणी
* घटनास्थळावरील 110 सीसीटीव्ही फुटेजपैकी 50 फुटेजची तपासणी
* घटनास्थळी 96 जणांची चौकशी
* राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना संशयिताचे रेखाचित्र पाठवले
* पुणे, मुंबई भागातील सुपारी किलरची माहिती घेऊन चौकशी
* तपासाकरिता 23 पथकात सुमारे 250 पोलिसांचा समावेश
* दाभोलकरविरोधी लोक व संघटनांची चौकशी