आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. दाभोलकर हत्याकांड: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा हाच पुरुषार्थ? बाबा आढाव यांचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - "आमचे मुख्यमंत्री पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला साकडे घालतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळच्या पशुपतीनाथाला जातात. हाच का तो यांचा पुरुषार्थ? या राज्यकर्त्यांना शूर म्हणावे का,’ असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी बुधवारी पुण्यात उपस्थित केला.
सनातन्यांचे कारखाने जिकडे-तिकडे जोरात चालू आहेत. धर्मांधता आणि वविेकशून्यतेला उत्तर देण्यासाठी वजि्ञान आणि वविेकाचे ब्रीद धरून शुद्रातशिुद्रांपर्यंत पोहोचणे हीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली ठरेल. डॉ. दाभोलकरांनी दिलेल्या विवेकाच्या गोळीमुळे माणूस मरणार नाही, तर उभाच राहील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला एक वर्ष उलटले, तरी अद्याप त्यांच्या मारेक-याचा शोध लागलेला नाही. त्याच्या निषेधार्थ पुण्यात आयोजित निषेध सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या सभेला राज्यभरातून आलेल्या परवरि्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. ज्येष्ठ अभनिेते डॉ. श्रीराम लागू, नसरूद्दीन शहा, रत्ना पाठक, अमोल पालेकर, सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, नागराज मंजुळे, अतुल पेठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याया बाळ, सुनीती सु. र., प्रा. अरविंद कपोले, अजित अभ्यंकर, गणेश देवी, सुभाष वारे आदींचा यात समावेश होता. अंधश्रद्धा नरि्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अवनिाश पाटील, उपाध्यक्ष अशोक धवरिे, साधनाच्या विश्‍वस्त वजिया चव्हाण, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले, तसेच डॉ. दाभोलकर यांची मुले डॉ. हमीद आणि अॅड. मुक्ता दाभोलकर आदी या वेळी उपस्थित होते.

आराेपींना पकडण्यास नव्हे, भांडण्यास वेळ मिळताे
एक वर्ष उलटल्यानंतरही डॉ. दाभोलकर यांच्या मारेक-याचा छडा लावू न शकलेल्या गृहमंत्री आर. आर. पाटील आणि राज्य सरकार यांचा सर्वच वक्त्यांनी तीव्र शब्दांत िधक्कार केला. नविडणुकीच्या जागावाटपावरून भांडत बसायला काँग्रेस-राष्ट्रवादीला वेळ मिळतो, परंतु डॉ. दाभोलकरांच्या खुन्यांना पकडण्यासाठी त्यांची बुद्धी खर्ची पडत नाही, अशी टीका या वेळी करण्यात आली. सुरुवातीला मनििटभर स्तब्धता पाळून डॉ. दाभोलकर यांना आदरांजली वाहिल्यानंतर सभा सुरू झाली.
दाभाेलकर ‘सामाजिक बाबा’
डॉ. हमीद यांनी दाभोलकर परविाराच्या वतीने समाजाप्रती ऋण व्यक्त करताना वविेकवादाची लढाई अखंड सुरू ठेवण्याचा नरि्धार व्यक्त केला. अॅड. मुक्ता म्हणाल्या की, बाबा केवळ आमचेच नव्हते तर ते "सामाजिक वडील' होते, याची जाणीव गेल्या वर्षभरात झाली. माणूस मारून विचार संपत नाही, हेच शेकडो तरुण कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे स्पष्ट झाले. माणसाला धर्मांध करण्याचा पहिला गळ म्हणजे अंधश्रद्धा होय. या अंधश्रद्धेला दूर ठेवण्यासाठी वविेकाचा विचार जविंत ठेवावा लागेल.

एक रुपयात कडीपत्ता, गृहमंत्री बेपत्ता
राज्यभरातून आलेल्या सुमारे पाचशेहून अधिक तरुणांनी निषेध सभेपूर्वी पुण्यात मोर्चा काढला. "वविेकाचा आवाज बुलंद झाला पाहजिे', "माणूस मरतो, विचार नाही', "एक रुपयाचा कडिपत्ता, आर. आर. पाटील बेपत्ता', "शाहू-फुले-आंबेडकर, आम्ही सगळे दाभोलकर' आदी घोषणांनी पुणे दणाणून गेले होते.
सभेतील वक्तव्ये
* वैज्ञानिक भान आणि सामाजिक दृष्टिकोनाचे बाळकडू राज्यकर्त्यांना द्यावे लागेल.
*बाजारू अर्थव्यवस्था वविेकवादाचा गळा घोटत आहे. केवळ बुवाबाजी, चमत्काराच्या पलीकडे जाऊन जातीव्यवस्थेविरूध्‍द लढा उभारावा लागेल. धर्मचिकित्सा करावी लागेल.
*महाराष्ट्रात झालेला अंधश्रद्धाविरोधी कायदा देशपातळीवरसुद्धा झाला पाहजिे.

साताऱ्यात विद्यायार्थी रॅली, मानवी साखळी
अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. यानमिित्त सातारा शहरातील ववििध सामाजिक संघटना व अंनिसच्या वतीने श्रद्धांजलीपर कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले होते. मारेक-याना पकडण्यात अपयशी ठरलेल्या सरकारच्या या संघटनांनी निषेध केला.
सातारा येथील विविध शाळा, महाविद्यायालयातील विद्यायार्थ्यांनी बुधवारी सकाळी रॅली व मानवी साखळी काढून डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी डॉ. दाभाेलकरांचे बंधू दत्तप्रसाद म्हणाले, डाॅ. नरेंद्रचे काम किती अवघड आणि महत्त्वाचे होते हे समजते. डॉक्टरांच्या पत्नी डॉ.शैला दाभोलकर म्हणाल्या, डॉक्टरांच्या हत्येला एक वर्ष झाले तरी मारेकरी अजूनही सापडत नाहीत हे संतापजनक आहे. डाॅक्टरांची हत्या झाली असली तरी त्यांचे विचार अजूनही संपलेले नाहीत.

प्लंॅचेटच्या चौकशीत दरिंगाई : खेतान
डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिका-यानी प्लॅँचेट केल्याचा प्रकार उघडकीस आणला. मात्र, याप्रकरणी तत्परतेने चौकशी करण्यात राज्य सरकार व पोिलस अधिका-यानी जाणीवपूर्वक दरिंगाई केली, असा आरोप पत्रकार आशिष खेतान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

खेतान म्हणाले, प्लॅँचेट प्रकरणातील संशयित, आरोपी व साक्षीदार हे पोिलस दलातील कर्मचारी आहे. या प्रकरणातील साक्षीदारांना शासनाच्या पाठिंबा देण्याची गरज होती. तशाप्रकारचे वातावरण बनवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अथवा गृहमंत्र्यांनी केला नाही. जादूटोणासारखे गंभीर प्रकार तपासात केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा संदेश देण्यात शासन अपयशी ठरले, असा आराेपही खेतान यांनी केला.

विवेकाचा आवाज बुलंद, आम्ही सारे दाभाेलकर...!
डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली त्या वि. रा. शिंदे पुलावर बुधवारी सकाळी साडेसात वाजता हजारो अंनिस कार्यकर्ते गोळा झाले. या वेळी त्यांनी एकत्रित समूहगायन करून वविेकाचा आवाज बुलंद करूया, फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर, माणूस मारता येतो, विचार मरत नाही! अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देऊन सुमारे पाच किलोमीटरची अभविादन रॅली काढली. या वेळी अनेकांना डॉ.दाभोलकर यांच्या आठवणीने अश्रू आवरणे कठीण झाले. हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही पोिलसांना सापडत नसल्याने कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या संतापास वाट मोकळी करून दिली.

‘राज्य शासनाची कीव येते’
बाबा आढाव : डॉ.दाभोलकरांनी बहुजनांमध्ये अंधश्रद्धेविरोधात जनजागृती केली. सरकारने त्यांना शेवटपर्यंत योग्य साथ दिली नाही. माणूस घडवण्याकरिता त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. सुपारी देऊन त्यांना गोळ्या घातल्या आहेत. गुन्हेगारांसमोर नतमस्तक होणाऱ्या शासनाची मला कीव येते.

नसरूद्दीन शहा : एक वर्ष होऊनही पाेिलसांच्या तपासात प्रगती झाली नाही, ही खेदजनक बाब आहे. सरकारला मला याबाबत काही सांगायचे नाही, पण मला याप्रकरणी लाजरिवाणे वाटत आहे.

नागराज मंजुळे : डॉ.दाभोलकर यांच्या हत्येनंतर प्लॅँचेटसारखे प्रकार करून पुन्हा पुन्हा हत्या केल्या जात आहेत. आजूबाजूला अराजक नरि्माण झाले असताना ढोलपथकात तरुणाई सध्या व्यग्र झाली आहे. हत्येनंतरही लोकजागृती होत असेल तर कोणतेही विचार मारणे अशक्य आहे.

सोनाली कुलकर्णी : सुसंस्कृत राज्यात विचारप्रवर्तक व्यक्तीची हत्या होते ही गोष्ट न शोभणारी आहे. डाॅ. दाभाेलकर यांच्या कामाबाबत गैरसमज पसरवण्यात आले. देवदेवतांवर वशि्वास ठेवणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. आर्थिक, सामाजिक, लैंगिक विषमतेविरोधात त्यांनी काम केले.

रत्ना पाठक-शहा : मी हा समाज सभ्य मानते. त्यामध्ये प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो. सर्वांना आपला विचार समोर ठेवण्याचा हक्क आहे. दाभोलकर यांच्याबाबत जे झाले ते याेग्य नाही. त्यांचा विचार एकीचा होता.

हेमंत गोखले : डॉ.दाभोलकर चांगले मित्र होते. डॉ.आंबेडकरांनी हिंदू धर्म कायदा बदलावा याकरिता प्रयत्न केले. तो कायदा त्यांच्या हयातीत पूर्ण झाला. मात्र, याबाबत दाभोलकर दुर्दैवी ठरले. अंधश्रद्धा कायदा त्यांच्या हत्येनंतर झाला. हत्येतील आरोपी अजूनही सापडत नाहीत ही बाब चिंताजनक आहे.