आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादा काेंडकेंचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, 19 पैकी 17 चित्रपटांचे हक्क भाचे सुनेकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अभिनेते दादा काेंडके यांच्या चित्रपटांच्या हक्कांवरून सुरू असलेली १२ वर्षाची लढाई काेंडके यांच्या नातेवाइकांनी जिंकली आहे. दादांच्या चित्रपटांचे हक्क त्यांची भाचेसून माणिक माेरे यांच्याकडे देण्याचा अादेश जिल्हा न्यायाधीश एस.बी.भालेकर यांनी दिला. दिल्ली येथील नूपुर कंपनीने दादांच्या चित्रपटांच्या बनावट सीडी, डीव्हीडी तयार करून त्या विक्री केल्याचा अाराेप माेरे यांनी केला हाेता. कोर्टाने परिस्थितीजन्य पुरावे तपासून काेंडके यांची बहीण लीलाबाई यांची मुलगी माणिक माेरे यांच्या बाजूने निकाल दिला.

हे आहेत चित्रपट
पांडु हवालदार, साेंगाड्या, वाजवू का, बाेट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर या मराठी चित्रपटांसह खाेल दे मेरी जुबान, अागे की सोच, तेरे मेरे बीच मैं, अंधेरी रात मे-दिया तेरे हाथ में या हिंदी चित्रपटांचा समावेश अाहे.
 
बातम्या आणखी आहेत...