आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीचा कट: नीलम गो-हे, मिलिंद नार्वेकरांवरील खटले मागे घेण्यास कोर्टाचा नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्धव ठाकरे व पाठीमागे त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर... - Divya Marathi
उद्धव ठाकरे व पाठीमागे त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर...
पुणे- दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्यानंतर दंगल घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात दाखल खटला मागे घेण्याबाबत राज्य सरकारने सादर केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांनी फेटाळून लावला आहे.

सरकारने खटले निकाली काढण्यासाठी ठराव केला असून त्यास पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक केली आहे. 21 सप्टेंबर रोजी पोलिस आयुक्त कार्यालयात एक बैठक झाली, त्यात गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांवर दाखल खटले काढून टाकण्याबाबत सरकारी वकील यांच्याकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयाने या शासनाच्या परिपत्रकाच्या आधारे सांगितले की, जी. आर. मध्ये केवळ कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. मात्र, सदर प्रकरण हे या तरतुदींच्या अंतर्गत येत नसून दंगल घडवण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे हे मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील खटल्यात येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पुढे वाचा, काय आहे दंगल कट प्रकरण?...
बातम्या आणखी आहेत...