आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dams Water Come Half Level, Serious Water Problem In Marathwada

राज्यात धरणे निम्म्याने आटली, मराठवाड्यात पाणीप्रश्न गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच धरणांचा पाणीसाठा निम्म्याने संपला असून, राज्यातील जलसाठा ४८ टक्क्यांवर आला आहे. त्यातही मराठवाड्याची स्थिती अधिकच बिकट आहे. विभागातील ११ मोठ्या धरणांत फक्त २६ टक्केच पाणी आहे. मध्यम व लहान धरणांतील साठ्याची टक्केवारी अनुक्रमे १७ व ११ अशी आहे.पावसाळा साडेतीन महिने लांब असतानाच यामुळे राज्य जलसंकटाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी आज रोजी राज्यात ५६ टक्के पाणी होते.

पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील धरणांत तुलनेने मुबलक पाणी असल्याने राज्याचा एकत्रित जलसाठा ४८ टक्के दिसत आहे. जायकवाडी आणि उजनी या राज्यातील सर्वात मोठ्या धरणांवर मराठवाडा व प. महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यांचे भवितव्य अवलंबून असते. जायकवाडीत फक्त २४ टक्के पाणी शिल्लक आहे. तुलनेेने उजनीत ५५ टक्के इतके भरपूर पाणी आहे. २०१३ मधील ९ फेब्रुवारीला उजनीचा साठा शून्यावर गेला होता.
ऊसच ठरतो आहे काऊस!
*केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात एकूण शेतीच्या फक्त ४ टक्के असणारा उस शेतीसाठीचे ७० टक्के पाणी संपवतो.
* राज्यात एक किलो साखर तयार होईपर्यंत १२० लिटर पाणी खर्च होते. शेजारच्या कर्नाटकने याबाबतीत महाराष्ट्रावर आघाडी घेतली आहे.
*कर्नाटकातील सव्वाचार लाख हेक्टर ऊस येत्या तीन वर्षात ठिबकखाली आणण्यासाठी साडेचार हजार कोटींची तरतूद आहे.
* महाराष्ट्रात साडेनऊ लाख हेक्टर ऊस आहे. राज्य सरकारने उसासाठी ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

माजलगाव, मांजरा 0, जायकवाडी २४ टक्के
मराठवाड्यात माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सिना कोळेगाव धरणे शून्यावर आहेत. जायकवाडीत २४ टक्के पाणी आहे. विभागात एकाही धरणात ५० टक्यांपेक्षा जात पाणी नाही. उर्वरित महाराष्ट्रातील इतर १६ धरणांत ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे.
विभाग201520142013
कोकण६२५९६३
मराठवाडा२६४२१३
नागपूर३६५९४३
अमरावती४४६१४४
नाशिक५३५४
३२
पुणे६०६४४८
(९ फेब्रु,ची स्थिती, स्रोत: जलसंपदा विभाग)
सरकारने काय करावे...
- डॉ. दि. मा. मोरे, माजी जलसचिव, महाराष्ट्र.
*आरक्षण हिशेबी : पिण्याचे पाणी आरक्षित करून जबाबदारी संपत नाही. शेतकरी कालव्यातून हे पाणी घेतात. पुणे, नाशिक, नगरचे हे प्रकार रोखावेत.
*धोरणात काटेकोरपणा फेब्रुवारीअखेर शेतीचे पाणी बंद करावे. आठमाही सिंचन हेच धोरण आहे. तेच राबवले जावे.
*गावे स्वयंपूर्ण करा : पिण्याच्या पाण्याबाबत तरी गावे स्वयंपूर्ण होण्याचे पाहावे. गावतळी जगवणे, नैसर्गिक जलस्रोतांचे जतन आणि संवर्धन कायमची जबाबदारी आहे.
*गाळ शेतक-यांना द्यावा उन्हाळ्यात धरणांतील गाळ काढण्यासाठी रक्कम ठेवावी. हा गाळ शेतकऱ्यांना दिला जावा.
*बंद नळाने पुरवठा : वितरणातील गळती व पाणीचोरीमुळे अपव्यय होतो. शहरांना बंद नळाने पाणीपुरवठा होतो. गावांतही तसाच व्हावा.

परराज्यातून गुरे येणे, चारा नेण्यावर बंदी
राज्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याने चारा समस्या मोठी आहे. दुसऱ्या राज्यात चारा नेण्यास बंदी घालतानाच काठेवाडी गुरे राज्यात आणण्यासही मनाई करणारे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत.