Home »Maharashtra »Pune» Daughter Funeral To Her Father In Sindhudurga

एकुलत्या एक मुलीने दिला वडिलांना मुखाग्नी; नातलगांनीही दिला परंपरेला छेद देत तिला पाठिंबा

कणकवली येथे एका मुलीने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिल्याची घटना घडली आहे. दीर्घ आजारामुळे या मुलीच्या वडिलांचे निधन झाले.

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 20:44 PM IST

  • दीक्षा ही आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.
पुणे-कणकवली येथे एका मुलीने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिल्याची घटना घडली आहे. दीर्घ आजारामुळे या मुलीच्या वडिलांचे निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. त्यांना एकच मुलगी आहे. तर या मुलीच्या नातलगांनी परंपरेला छेद देणाऱ्या या मुलीला पाठिंबा दिला. या मुलीला वडिलांना मुखाग्नी देताना पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.
नेमके काय घडले?
- कणकवलीतील शिवाजीनगरमध्ये राहणारे दिलीप कोलवणकर (55) यांचे रविवारी निधन झाले. त्यांनी दीक्षा नावाची एकच मुलगी आहे. ती सध्या 12 वीत शिकत आहे. त्यांना मुलगा नसल्याने मुखाग्नी कोण देणार याबाबत नातलग चिंतेत होते.
- भारतात आजही अनेक ठिकाणी केवळ मुलगाच आई-वडिलांना मुखाग्नी देतो. पण दीक्षाने मुखाग्नी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याला सर्व नातलगांनीही पाठिंबा दिला.
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती

Next Article

Recommended