आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिष्ठ रुढी, परंपरांना छेद देत मुलीने वडिलांना दिला मुखाग्नि, उपस्थितांची डोळे पाणावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे अनिष्ठ रुढी, परंपरांना छेद देत एका मुलीने वडिलांना मुखाग्नि देऊन अंत्यसंस्कार केले. विजयकुमार जाधव (55) यांचे  दीर्घआजाराने गेल्या आठवड्यात निधन झाले. जाधव यांना तीन मुली आहेत. पुतण्याने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. नंतर जाधव यांच्या धाकट्या मुलीने वडिलांना मुखाग्नि देण्याचा निर्णय घेतला. तिला पती आणि आईकडून पाठिंबा मिळाला. मुलीला वडिलांना मुखाग्नि देताना पाहून उपस्थितांची डोळे पाणावले होते.

काय आहे हे प्रकरण?
- बार्शी ‍तालुक्यातील अलीपूर मार्गावर राहाणारे विजयकुमार जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
- जाधव यांची कंपनीत नोकरी करत होते. त्यांचा तीन मुली आहेत. मुली होतकरू आहेत. त्यामुळे जाधव यांना मुलाची कधीच कमी भासली नाही.
- जाधव यांनी तिन्ही मुलींचे शिक्षण करून त्यांचा विवाह करून दिला. त्यांची एक मुलगी बार्शीमधील एका शाळेत शिक्षिका आहे.
- जाधव यांचे जावई महेश हे सामाजिक कार्यकर्ता आहे. त्यांनी पत्नी विनया हिला वडिलांना मुखाग्नि देण्यास सांगितले.
- महेश यांचा निर्णय ऐकून उपस्थित नागरिकांनी विरोध केला. परंतु विनया मागे राहिली नाही. तिने वडिलांना मुखाग्नि देण्याचा आग्रह धरला.
- विनयाला या कामात तिच्या आईने पाठिंबा दिला.

पुढील स्लाइड्सवर पाहा फोटो... मुलीने वडिलांना दिला मुखाग्नि
बातम्या आणखी आहेत...