आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PUNE BLAST : 'बॅगेत काय ठेवलंय बघायला गेल्यावर झाला स्फोट'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जंगली महाराज रस्त्यावर टीम अण्णाच्या समर्थनार्थ उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांची भाषणे मी ऐकत होतो. माझ्याजवळ असलेल्या बॅगेत केक तसेच अन्य काही वस्तू होत्या. त्या धरायला जड होत असल्याने मी हातातील बॅग खाली ठेवली. त्यावेळी कोणीतरी माझ्या बॅगेत काहीतरी वस्तू आणून ठेवली. ती वस्तू काय आहे, हे बघण्यासाठी मी माझी बॅग उघडली, त्यावेळी तिथे स्फोट झाला, अशी माहिती या स्फोटातील एकमेव जखमी व्यक्ती दयानंद पाटील याने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाटील हे ३४ वर्षांचे असून ते उरुळी कांचन येथे राहतात. जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामुळे पाटील यांच्या पोटाजवळ जखम झाली आहे.
पुण्यात बुधवारी संध्याकाळी झालेल्या चार स्फोटांमुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. पाटील यांच्याकडील बॅगेतच स्फोट झाल्याने त्यांच्यावर पोलिस यंत्रणेने संशय व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलिसांकडे जबाब दिला आहे.
PHOTOS : चाळीस मिनिटांत झाले चार स्फोट