आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात चक्क मृतदेहांची अदलाबदल; दुसर्‍याच पार्थिवावर झाले अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी परदेशी व दूरच्या शहरात असलेल्या मुला- मुलीस येता यावे, यासाठी नातेवाइकांनी एकाचा मृतदेह पुण्यातील एका खासगी रुग्णालयातील शीतगृहात ठेवला हाेता. मात्र, शवागारातील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे मृतदेहांची अदलाबदल हाेऊन, दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस अाला अाहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने माफी मागितली अाहे.
पुण्यातील लेकटाऊन येथे राहणारे रमेशचंद्र वेद हे िबबवेवाडीतील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत हाेते. मात्र एक जानेवारी राेजी त्यांचे निधन झाले. त्यांचा एक मुलगा संजीव हा अमेरिकेत तर मुलगी उर्वशी माथूर ही िदल्ली येथे स्थायिक अाहे. या दाेघांनाही वडिलांचे अंतिम दर्शन घेता यावे, त्यांच्या उपस्थितीतच अंत्यसंस्कार व्हावेत, अशी कुटुंबीयांची इच्छा हाेती. त्यामुळे धाकटा मुलगा संदीप वेद याने रमेशचंद्र यांचे पार्थिव राव रुग्णालयातील शीतगृहात ठेवले हाेते. त्याच वेळी याच रुग्णालयात मेंदूवर उपचार घेत असलेल्या श्रीराम गंधे यांचा तीन जानेवारी राेजी मृत्यू झाला. त्यांचे नातेवाईक येण्यास उशीर असल्याने त्यांचा मृतदेहदेखील राव रुग्णालयातील शीतगृहात पाठवण्यात अाला हाेता. दरम्यान, गंधे यांचे कुटुंबीय श्रीराम यांचा मृतदेह नेण्यास अाले असता, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेहाची अाेळख पटवून श्रीराम गंधे यांच्या मृतदेहाएेवजी रमेशचंद्र वेद यांचा मृतदेह गंधे कुटुंबीयांकडे साेपवला. त्यानंतर गंधे कुटुंबीयांनी रमेशचंद्र यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. दरम्यान, रुग्णालयात पाेहोचलेल्या वेद यांच्या मुलांनी वडिलांच्या मृतदेहाची मागणी केली. शीतगृहात ते मृतदेह अाणण्यासाठी गेले असता त्यांना धक्काच बसला. कारण रमेशचंद्र यांची शवपेटी रिकामीच हाेती.
रुग्णालयात डाॅक्टर, कर्मचाऱ्यांची धावपळ
मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे उघड हाेताच रुग्णालयातील कर्मचारी व डाॅक्टर यांची पाचावर धारण बसली. धावपळ करून त्यांनी जवळचीच दुसरी शवपेटी उघडली असता, त्यात गंधे यांचा मृतदेह दिसून अाला. रुग्णालयातील डाॅक्टरांनी गंधे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना मृतदेहाचा फाेटाे काढून पाठवला. त्या वेळी अापण दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे लक्षात अाल्याने गंधे कुटुंबीयांनाही धक्का बसला. या गाेंधळामुळे गंधे अाणि वेद कुटुंबीयांनी डाॅक्टरांना धारेवर धरले. डाॅक्टरांनी माफी मागत दाेषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, वेद कुटुंबीयांनी या अक्षम्य चुकीबद्दल रुग्णालयाविरुद्ध बिबवेवाडी पाेलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगितले.