आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योगपती नीळकंठराव कल्याणी यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ज्येष्ठ उद्योगपती डॉ. नीळकंठराव कल्याणी यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. 1951 मध्ये कल्याणी यांनी भारत फोर्ज कंपनीची स्थापना केली. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

नीळकंठरावांचा जन्म 20 ऑगस्ट 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील कोळे गावात शेतकरी कुटुंबात झाला. उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुण्यात मुंढवा येथे भारत फोर्जची स्थापना केली. अल्पावधीत कंपनीला लौकिक मिळवून दिला. जर्मनीतील सीडीपी ही सर्वात मोठी फोर्जिंग कंपनी ताब्यात घेऊन कल्याणी यांनी देशाचे नाव जागतिक उद्योगविश्वात अधोरेखित केले. कारखाना देवालय, मशीन देव व उत्पादन ही भक्ती या त्रिसूत्रीवर त्यांनी कंपनीला स्वतंत्र अस्तित्व दिले. देशातील पहिले कृषी केंद्र त्यांनी आपल्या शेतात स्थापन केले होते. ते राहत असलेला परिसर कल्याणीनगर म्हणून ओळखला जातो. त्यांच्या पश्चात पत्नी सुलोचना, मुले बाबा, गौरीशंकर आणि कन्या सुगंधा हिरेमठ आहेत.