आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणेकरांनी ‘डेक्कन क्वीन’ पाऊणतास रोखली; आंदोलन मागे घेतल्यावर मुंबईकडे रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे-मुंबई-पुणे असा रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या हक्काची डेक्कन क्वीन आज पुणेकरांनी जवळपास पाऊणतास रोखून धरली होती.
 
का केले प्रवाशांनी आंदोलन
नेहमी फलाट क्रमांक 1 वर थांबणारी डेक्कन क्वीन गेल्या ६ महिन्यांपासून फलाट क्रमांक 5 वर थांबत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे करुनही त्यांनी याची दखल न घेतल्याने प्रवाशांनी आज हे आदोलन केले.
 
अन्य रेल्वे गाडया वेळेवरच
पुणे स्थानकावरून आज तब्बल 45 मिनिटे उशिराने ही गाडी निघाली. यामुळे दररोज सकाळी 7.15 वाजता निघणारी डेक्कन क्वीन आज सकाळी 8 च्या सुमारास मुंबईकडे रवाना झाली. सोमवार कामाचा दिवस असल्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु, नियमित प्रवाशांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने इतर प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. अनेक प्रवाशांना कशामुळे उशीर होतोय याची माहिती मिळत नव्हती. अखेर ८ च्या सुमारास आंदोलकांनी नमते घेतल्यानंतर डेक्कन क्वीन मुंबईकडे मार्गस्थ झाली. डेक्कन क्वीन नंतर निघणाऱ्या रेल्वेही मुंबईकडे मार्गस्थ झाल्या होत्या. परंतु, डेक्कन क्वीन निघत नसल्याने प्रवाशांमध्ये काही काळ अस्वस्थता पसरली होती. पुणे-मुंबई-पुणे असा रोज प्रवास करणाऱ्यांसाठी डेक्कन क्वीन ही अत्यंत सोयीची रेल्वे असल्याचे मानले जाते. 
बातम्या आणखी आहेत...