आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणीने सौदर्यासह मेंटेन केले Six Pack, कुटुंबाची जबाबदारीही निभावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बॉडी बिल्डींग हे केवळ पुरुषांसाठीचे क्षेत्र आहे आणि त्यामुळे महिलांचे सौंदर्य कमी होते, असे तुम्हाला वाटत असेल तर पुण्याच्या दीपिकाला पाहिल्यानंतर तुमचा विचार नक्की बदलेल. दीपिका चौधरी ही पहिली इंटरनॅशनल फिगर अॅथलीट विजेती आहे. बॉडी-बिल्डिंग करून सिक्स पॅक कमावल्याने महिलांच्या सौंदर्यात जराही फरक पडत नाही, असा दीपिकाचा विश्वास आहे. सौंदर्य आणि सिक्स पॅक मेंटेन करण्याबरोबर दीपिकाने कुटुंबाची जबाबदारीही सांभाळली आहे.

पहिली इंटरनॅशनल फिगर अॅथलीट
दीपिका चौधरी सध्या पुण्याच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये टेक्निकल रिसर्च असिस्टंट म्हणून काम करते. जागतिक महिला बॉडी बिल्डिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपिकाने एप्रिल 2015 मध्ये अमेरिकेत आयोजित इंटरनॅशनल फिगर अॅथलीट कॉम्पिटिशनमध्ये विजेतेपद मिळवले होते. जागतिक स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विजय मिळवणारी दीपिका ही पहिली महिला आहे.

अथक परिश्रम
जागतिक किर्तीचे फिटनेस कोच सेनन डे यांची भेट झाल्यानंतर दीपिकाचा बॉडी बिल्डींगकडे कल वाढला होता. इंटरनॅशनल फिगर अॅथलीट्सच्या स्टेजवर पाहून दीपिकाने त्यांच्या सारखे बनण्याचा निश्चय केला आणि पुण्याच्या बॉम्बसेल फिटनेस सेंटरमध्ये दररोज तासनतास ट्रेनिंग आणि डाएट प्रोग्रामच्या आधारे केवळ 2 वर्षात देशातील टॉप फिगर अॅथलीट बनली.

भीती चुकीची
दीपिकाच्या मते, जिममध्ये वजन उचलने आणि वेट लिफ्टींगबाबत महिलांमध्ये एक भीती असते. बहुतांश स्त्रियांना असे वाटते की जास्त व्यायाम केल्याने त्या पुरुषांप्रमाणे दिसू लागतील. पण ते खरे नाही. संशोधनानुसार स्त्रियांचे पुरुषांप्रमाणे दिसणे हे हार्मोन्समुळे होत असते. दीपिका गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या मनात असलेली ही भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

कुटुंबाची जबाबदारी सांभाळली
31 वर्षीय दीपिका बॉडी बिल्डिंगबरोबरच कुटुंबाती जबाबदारीही योग्यपणे पार पाडत आहे. दीपिका सासू सासरे आणि पती तनुजितबरोबर पुण्यात राहते. जिममध्ये जाण्यापूर्वी संपूर्ण कुटुंबासाठी नाश्ता तयार करून जाते. तसेच सायंकाळी ऑफिसमधून आल्यानंतर कुटुंबासह एकत्रितपणे जेवण करते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, दीपिका चौधरीचे काही निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...