आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका, रणबीरच्या रामलीलेत पुणेकर रंगले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशभर सचिनोत्सव साजरा होत असताना शुक्रवारी पुण्यातील हडपसर येथील मगरपट्टा सिटीत मेगाप्लेक्स परिसरात अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. संजय लीला भन्साळी यांचा ‘रामलीला’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. यानिमित्त दोघेही पुण्यात आले होते. त्यांच्या आगमनानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला. दीपिका आणि रणबीरने चाहत्यांना निराश न करता हात उंचावून अभिवादन केले.
भारतातील पहिल्या आंतरराष्‍ट्रीय सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिसतर्फे देशातील 15 स्क्रीन एकाच ठिकाणी असलेल्या मेगाप्लेक्सचे दीपिका आणि रणबीरच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दीपिका म्हणाली, रामलीलासाठी खूप मेहनत घेतली असून प्रेक्षक नक्कीच त्याला प्रतिसाद देतील.
हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा ठरेल अशी आशा वाटते. गुजराती पद्धतीचे पारंपारिक कपडे व दागिने यांचा चित्रपटात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. भन्साळी यांच्यासोबत काम करताना पूर्ण तयारीनिशी राहावे लागते.
प्रियंकासोबत वाद नाही
रामलीला चित्रपटात अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचे एक आयटम सॉँग आहे. चित्रीकरणादरम्यान प्रियंकाशी वाद झाल्याच्या बातम्या माध्यमांतून आल्या होत्या. यावर दीपिका म्हणाली, तिच्यासोबत माझा कोणताही वाद नसून आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत. सचिनच्या निवृत्तीबाबत रणवीर म्हणाला, मी सचिनचा लहानपणापासून चाहता असून शेवटच्या मॅचमध्ये त्याचे शतक पूर्ण व्हावे असे वाटत होते. मात्र, तो आऊट झाला तरी त्याने दिलेले योगदान बहुमोल आहे. याप्रसंगी दीपिका आणि रणवीरने पुण्यात घर खरेदी केल्याचे सांगितले.