आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठुनामाच्या गजरात तुकोबांच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ-मृदंग आणि ओठांवर विठुनामाचा गजर, तुकोबांचे अभंग घेऊन लक्षावधी वैष्णवांचा जणू महासागरच रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाला. जमलेले हजारो भाविकांच्या उपस्थितीत व ढोल-ताशा-झांज पथकांच्या निनादात शहराच्या वेशीवर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर पालखी सोहळा रात्रीच्या विसाव्यासाठी आकुर्डीमधील मंदिरात रवाना झाला. आज (सोमवारी) सकाळी पालखीने पुण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.


पिता-पुत्रांची हृद्य भेट
तुकोबांचे धाकटे पुत्र नारायणबाबा यांचे समाधी देहूमध्येच आहे. देहू संस्थानच्या वतीने यंदा प्रथमच पालखी प्रस्थानप्रसंगी तुकोबांच्या पादुका नारायणबाबा समाधी मंदिरात नेण्यात आल्या. पालखी सोहळ्याची परंपरा नारायणबाबांनी सुरू केली, असे मानले जाते. या पार्श्वभूमीवर देहू संस्थान विश्वस्तांनी पिता-पुत्रांची आंतरिक जिव्हाळ्याची ही भेट भाविकांना घडवली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीरसात चिंब झाले वारकरी.