आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माउलींच्या पालखी सोहळ्याचे काउंटडाऊन, आता फक्त राहिले १५ दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यभरातील लक्षावधी वारकरी आणि भाविक यांच्या आगमनाचे वेध आता देहू-आळंदी परिसराला लागले आहेत. पालखी सोहळ्याला आता फक्त १५ दिवस राहिले असल्याने भाविकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा झटत आहे. देहू आणि आळंदी देवस्थान समितीनेही पालखी सोहळ्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आल्याची माहिती दिली.

यंदा देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ८ जुलै रोजी प्रस्थान होणार आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ९ जुलै रोजी होणार आहे. या दोन्ही ठिकाणी प्रशासन, नगर परिषदा, देवस्थान कमिटी तसेच अन्य अनेक स्वयंसेवी संस्थांच्या वतीने वारकर्‍यांसाठीच्या मूलभूत सोयी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती देहू संस्थान कमिटीचे सुनील मोरे आणि आळंदी देवस्थान कमिटीचे विश्वस्त प्रशांत सुरू यांनी दिली.

संत गजानन महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान
शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी, पायदळ दिंडी विठ्ठल नामाचा गजर करत मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यात टाळकरी, वारकरी, पताकाधारींसह सुमारे ५०० हून अधिक जण सहभागी होणार आहेत. तसेच सोबत भजनी मंडळ, अश्व राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...