आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहू-आळंदीचा परिसर वारकर्‍यांनी गजबजला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - श्रीक्षेत्र देहू आणि आळंदीचा संपूर्ण परिसर विठुरायाच्या गजराने दुमदुमत असून राज्यभरातून लक्षावधी वारकर्‍यांचे आगमन येथे झाले आहे. शनिवारी देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून पालखी सोहळ्याचा मंगलमय प्रवास सुरू होणार आहे. त्यापाठोपाठ 30 जून रोजी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान आळंदी येथून होणार आहे. पालखी सोहळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
वारकºयांच्या गर्दीमुळे इंद्रायणीचे घाट गजबजले असून स्नानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. देहू आणि आळंदीमध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुष्काळामुळे वारकºयांची संख्या कमी होती. यंदा मात्र पावसाने कृपा केल्याने सुमारे पाच ते सात लाख वारकºयांचा मेळा देहू-आळंदीमधून मार्गस्थ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा महिला वारकºयांची संख्याही लक्षणीय दिसत आहे.

मार्गाचे चौपदरीकरण
साताºयातील लोणंद ते फलटणदरम्यानच्या पालखी मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करण्यात आल्याने या वर्षी एकाच रस्त्याने पालखी आणि शेजारी वाहने असे मार्गक्रमण शक्य होणार आहे. दोन वर्षांत वाहने वारीत घुसून अपघातांचे प्रकार घडले होते. त्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंद झाल्याने वारकर्‍यांनीसमाधान व्यक्त केले आहे.
एसटीच्या जादा गाड्या
राज्यभरातील वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी राज्य एसटी महामंडळाने वारीच्या दिवसांत जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नेहमीच्या फेºयांच्या जोडीने अतिरिक्त तीनशे बस आषाढीपर्यंत धावतील.
प्रशासनही सज्ज
वारी सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचे विविध विभागही सज्ज झाले आहेत. पोलिस, होमगार्ड, एसटी व स्थानिक बस, आरोग्य विभाग, अग्निशमन यंत्रणा, विद्युत पुरवठा विभाग, मनपा, सफाई विभाग, पाणीपुरवठा यंत्रणा, रस्ते देखभाल विभाग या सार्‍यायंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.