आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Result 2015: Maharashtra's Great Contribution In Aap's Victory In Delhi

महाराष्ट्राच्या भक्कम साथीने ‘आप'ने जिंकली दिल्ली, शेकडो कार्यकर्त्यांकडून प्रचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील ऐतिसहासिक यशात महाराष्ट्राने सिंहाचा वाटा उचलला आहे. राज्यातून प्रचारासाठी गेलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी घाम गाळला. एवढेच नव्हे तर ‘आप’च्या खजिन्यात देशात दुस-या क्रमांकाची भर टाकणारे राज्यदेखील महाराष्ट्रच ठरले.
२०१४ पासून आतापर्यंत ‘आप'ला जगभरातून १८ कोटी ४२ लाख ८२ हजार ६०६ रुपये मिळाले. यातील सर्वाधिक म्हणजे सुमारे पावणेसहा कोटी रुपयांच्या देणग्या दिल्लीतील नागरिकांनी दिल्या. त्यापाठोपाठ २ कोटी ४३ लाख ६७ हजार २९६ रुपयांची भरीव आर्थिक रसद महाराष्ट्राने पुरवली. महाराष्ट्रानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेशातूनही सर्वाधिक देणग्या मिळाल्या.

पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख संघटक प्रा. सुभाष वारे यांनी सांगितले, 'माझ्यासह राज्यातील तीनशे कार्यकर्ते गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत तळ ठोकून होते. कार्यकर्त्यांमध्ये विद्यार्थी आणि आयटी क्षेत्रातील तरुणांचा भरणा सर्वात जास्त होता. दिल्लीतल्या वस्त्या-वस्त्यांमध्ये गेल्यावर आम्हाला जिंकण्याची खात्री झाली. मात्र एवढ्या जबरदस्त यशाची अपेक्षा नव्हती. या विजयाने महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.’

पुढे वाचा ... चार लाख फोन कॉल्स