आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जातपंचायतविरुद्ध लढ्याला संरक्षण द्या, विविध मान्यवरांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जातपंचायतीच्या विरोधात समोर आलेल्या तक्रारींच्या आकड्यापेक्षा जात पंचायतीच्या दबावाने गप्प बसलेल्या प्रकरणांचा आकडा मोठा आहे. जातपंचायतीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे, असा सूर जातपंचायतविरोधी कायदा मागणी परिषदेत येथे उमटला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय जातपंचायतविरोधी कायदा मागणी परिषदेत सहभागी झालेल्या वक्त्यांनी ही मागणी केली.
डॉ. बाबा आढाव, मुक्ता मनोहर, अविनाश पाटील, रामनाथ चव्हाण, सुभाष वारे, डॉ. मनीषा गुप्ते, किशोर ढमाले, मिलिंद चव्हाण, मनीषा महाजन, रंजना गवांदे, कृष्णा चांदगुडे, मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोळकर या वेळी उपस्थित होते.

डॉ. आढाव म्हणाले, अंनिसच्या चळवळीचा व्यापक विस्तार गरजेचा आहे. समाजात काही ठिकाणी असणाऱ्या अघोरी पद्धती योग्य नाहीत. अशा कृत्यांना चालना देणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. पोटजातींचे प्रश्नही गंभीर होत आहेत. या वेळी सुभाष वारे म्हणाले, सुधारित मानल्या जाणाऱ्या जातींमध्येही अदृश्य स्वरूपातली जातव्यवस्था अस्तित्वात आहे. शिक्षणापासून वंचित समूहांना सुधारण्याचा प्रयत्न होणे अगत्याचे आहे.
अंनिसने बार्टीला सुचवलेले बदल
> जातपंचायत एकत्र येऊ नये यासाठी जातीसाठी येणारा जमाव व त्यांची कृत्ये बेकायदेशीर समजली जावीत.
> गुन्हेगारांना कमीतकमी ७ वर्षे शिक्षा व १० लाखांपर्यंतचा दंड व्हावा
> अटकपूर्व जामीन मिळू नये
> अदखलपात्र गुन्हा ठरवावा
> जातपंचायती विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे.
जाेशी समाजातील जातपंचायत बरखास्त
घटनात्मक न्यायव्यवस्थेला समांतर असणारी जातपंचायतीची न्यायव्यवस्था अाम्हाला मंजूर नाही. त्यामुळे जातीत अज्ञानीपणा व अजानतेपणाने अद्याप चालू असलेली जातपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा भटके जाेशी समाजाच्या मेळाव्यात घेण्यात अाला.

या वेळी बाळकृष्ण रेणके म्हणाले की, नाशिकमधील जातपंचायत अांतरजातीय विवाहाविराेधात हाेती. परंतु धुळे, नंदुरबार, जळगाव, लातूर, साेलापूर या िजल्ह्यातून जाेशी, गाेंधळी, वासुदेव, चित्रकथी, बागडी या भिक्षेकरी जमातीत अापसात असंख्य अांतरजातीय विवाह जातपंचायतींच्या पुढाकाराने झालेले अाहेत. म्हणजेच साऱ्याच जातपंचायती वाईट अाहेत असे म्हणता येणार नाही.
बातम्या आणखी आहेत...