आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ph.D.साठी पुण्यात आलेल्या इराणी तरुणीकडे प्राध्यापकाने केली शरीरसुखाची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- इराण येथून पीएचडी करण्यासाठी पुण्यात अालेल्या तरुणीकडे प्राध्यापकाने शरीरसुखाची  मागणी केल्याची घटना पुण्यात गुरुवारी उघडकीस  आली. याप्रकरणी तरुणीने तक्रार दिल्यानंतर प्राध्यापक शिवाजी नारायण बाेऱ्हाडे (५३, रा. कृष्णानगर, सांगवी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली अाहे.  

शिवाजी बाेऱ्हाडे हा विवाहित असून त्याला दाेन मुली अाहेत. त्यापैकी एका मुलीचे लग्न झाले अाहे. पुण्यातील पाैड रस्त्यावरील यशवंतराव माेहिते महाविद्यालयात तो अनेक वर्षांपासून प्राध्यापक आहे. तक्रारकर्ती विद्यार्थिनी इराणची रहिवासी असून ती अकाउंट विषयात पीएचडी करण्यासाठी मागील एक वर्षापासून पुण्यात आहे. पीएचडी करण्यासाठी ती बाेऱ्हाडेचे मार्गदर्शन घेत हाेती. ८ अाॅगस्ट राेजी तरुणी बोऱ्हाडेला भेटण्यासाठी गेली. त्या वेळी त्याने तरुणीला पीएचडीसाठी मदत करतो. मात्र, त्याबद्दल आपल्याला शरीरसुख द्यावे, अशी मागणी केली. या प्रकारामुळे चक्रावून गेलेल्या तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी बोऱ्हाडे याला अटक करण्यात  आली  असून त्याची चौकशी करण्यात येत  आहे. दरम्यान, परदेशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची  मागणी करण्यात आली  आहे. 
बातम्या आणखी आहेत...