आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Depends On The Question Of The Future Of Union European Greece: Dr. Narendra Jadhav

ग्रीसच्या प्रश्नावर युराेपियन युनियनचे भवितव्य अवलंबून : डॉ. नरेंद्र जाधव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. नरेंद्र जाधव - Divya Marathi
डॉ. नरेंद्र जाधव
पुणे- युराेपातील पाेर्तुगाल, स्पेन, इटली व ग्रीस या देशांवर कर्जाचा बाेजा वाढल्याने त्यांची अार्थिक परिस्थिती बिकट झाली अाहे. जर्मनीने ग्रीसला दिलेल्या २२० अब्ज डाॅलर कर्जाची परतफेड हाेत नसून अार्थिक काटकसरीच्या उपाययाेजनादेखील हाेत नाही. ग्रीसच्या डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेचा तसेच तेथील शासनाच्या निर्णयाचा दूरगामी परिणाम हाेऊन युराेपियन युनियनच्या एकसंधतेला तडा जाऊ शकताे. त्यामुळे ग्रीसच्या प्रश्नावर युराेपियन युनियनचे भवितव्य अवलंबून असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ.नरेंद्र जाधव यांनी साेमवारी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघ अायाेजित ‘जागतिक मंदी अाणि त्याचे भारतावरील परिणाम’ या विषयावर ते बाेलत हाेते.
डाॅ.जाधव म्हणाले, काेणत्याही कर्जाचा वापर हा उत्पादक गाेष्टीत झाल्यास त्याचा परतावा मिळत असताे. मात्र, ग्रीसमध्ये घेण्यात अालेल्या कर्जाचा वापर हा अनुउत्पादक गाेष्टीवर मोठ्या प्रमाणात झाल्याने परिस्थिती बिकट झाली अाहे. दरवेळी मागील कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेतले जात असल्याने कर्जाचे हप्ते फेडले गेले नाहीत. ग्रीसला जर्मनीने मदत न केल्यास ते रशियाकडे मदतीसाठी जाऊ शकतात तसेच रशियाला ग्रीसमधील नाैदल तळ वापरण्यास देऊ शकत असल्याने त्याचे दूरगामी परिणाम युराेपमध्ये हाेतील.
इतर देशात मंदी असताना भारतातही महामंदी येणार असे भाकीत अनेकजण करतात. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असल्याने असे म्हणणे अयाेग्य अाहे. अशी भीती दाखवणे म्हणजे एक बागुलबुवा अाहे, असे मत डाॅ. जाधव यांनी व्यक्त केले.
मराठवाड्यात शेतकरी अात्महत्या दुर्दैवी
डाॅ.जाधव म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश असून कृषी क्षेत्राचा जीडीपीतील वाटा १८ % असून त्यावर ४९ % लाेकसंख्या अवलंबून अाहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकरी अात्महत्येबाबत उल्लेख न येणे हे असंवेदनशील कृत्य अाहे. महाराष्ट्रात सिंचन क्षेत्रात वाढ न झाल्याने, पावसाची अवकृपा झाल्यावर त्याचा परिणाम जाणवताे. पावसाने अाेढ दिल्याने, गारपीट घटना घडल्याने तसेच शासनाने कृषीकडे दुर्लक्ष केल्याने मराठवाडा, विदर्भात शेतकरी अात्महत्या करत असून ही दुर्दैवी बाब अाहे.’