आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Spacial Story: अभियांत्रिकीचे विद्यार्थी घडवत आहेत ग्रामीण भागाचा विकास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिवासी समाजाच्या ठाकरवाडीमध्ये हा आगळा वेगळा उपक्रम - Divya Marathi
आदिवासी समाजाच्या ठाकरवाडीमध्ये हा आगळा वेगळा उपक्रम
पिंपरी चिंचवड/आळंदी: अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य हे तंत्रज्ञानाचं शिक्षण, लॅपटॉप आणि इंटरनेट या भोवतीच गुंतलेले असतात. पुण्याच्या आळंदी येथील इंजियरिंगचे विद्यार्थी मात्र याला अपवाद ठरलेत. तंत्रज्ञानाचं शिक्षण घेणारे हे तरुण सामाजिक कार्यातून माणुसकीचे धडे ही घेत आहेत. पुण्याच्या खेड तालुक्यातील चर्होली खुर्द गावात आदिवासी समाजाच्या ठाकरवाडीमध्ये हा आगळा वेगळा उपक्रम सुरु आहे. 125 कुटुंबाच्या या वाडीचा विकास करण्यासाठी इंजिनीयरिंगचे विद्यार्थी आटापिटा करतायेत. यासाठी त्यांनी "व्हिजन फायटर्स " या ग्रुप ची स्थापना केली आहे. 
 
 
व्हिजन फायटर्सचे सदस्य गेल्या दोन महिन्यापासून आदिवासी समाजाच्या नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना काय आहेत, याची कल्पना तर देत आहेत, त्यासोबत या योजनांचा लाभ कसा घ्यावा याची माहिती ही देत आहेत. तसेच गाव हागणदारी मुक्त, कचरामुक्त करण्यासाठी ही प्रयत्नशील आहे. ग्रामस्थांना मात्र हे विद्यार्थी नेमकं काय करतात हे तुम्हाला माहित आहे का? असे विचारले असता, त्यांनी गावाच्या समस्या मांडायला सुरवात केली. यावरून हे स्पष्ट झाले की, या ग्रामस्थांना त्यांच्या समस्यांविना जगात काय सुरु आहे, याची पुसटशी कल्पना ही नाही. गावकऱ्यांना हे काय चाललंय माहित नसलं तरी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या मुलांना मात्र त्यांच उज्वल भविष्य दिसू लागले आहे. आदिवासी समाजातील या मुलांना शिक्षणच माहित नसल्याने त्यांना लॅपटॉप कुठून उमगणार हा ही प्रश्न येथे उपस्थित होत आहे. अशी परिस्थिती असताना इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी त्यांना लॅपटॉपपासून शिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत ही मुलं शिक्षणात रमल्याचं दिसून आले.  
 
गेल्या अनेक वर्षांपासून सरकारचा एक ही माणूस न फिरकलेल्या या ठाकरवाडीत आता इंजिनियरिंगच्या या विद्यार्थ्यांचा रोजच वावर सुरु आहे. विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी घेतलेला पुढाकार भविष्यात निश्चित फायदेशीर ठरणारा असेल असा विश्वास सरपंच काळुराम थोरवे यांनी व्यक्त केला.  
 
आळंदी येथील एमआयटी महाविद्यालयात इंजिनियरिंगचं शिक्षण घेणाऱ्या 24 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन "व्हिजनरी फायटर्स" नावानं ग्रुप साकारलाय. केवळ तंत्रज्ञानाचं शिक्षण घेण्याऐवजी समाजातील व्यक्तींच्या गरजा जाणून घेणं आणि त्यासाठी पाठपुरावा करणं असं ध्येय गाठण्याचा आम्ही निश्चय बांधला आणि महाविद्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठाकरवाडीचा सर्वे करून समाज कार्याचा श्रीगणेशा केला.- अक्षय शिंदे अभियांत्रिकीचा विद्यार्थी
 
125 कुटुंबातील 700 लोकांचा विकास करण्याचा व्हिजनरी फायटर्सचा हा पहिला टप्पा आहे. हा टप्पा संपल्यानंतर गावातील अन्य वाड्यांचा विकास साधण्याचा त्यांचा मानस आहे. हा विकास करताना ते इतर सामाजिक संस्थांची मदत ही घेत आहेत. त्यांचे हे पाऊल नक्कीच अनेकांना प्रेरणा देणारं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर गाव दत्तक घेणाऱ्या खासदारांना चपराक देणारं ठरेल हे ही नक्की.
 
पुढील स्लाईडवर पाहा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची फोटोज आणि व्हिडीओ...
बातम्या आणखी आहेत...