आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाबद्दल पुण्यात मुख्यमंत्र्यांचा कौतुक सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भातले विधेयक विधिमंडळात मंजूर करून घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन ‘शिवसंग्राम'च्या विनायक मेटे यांनी केले आहे. पाच जानेवारीला पुण्यात हा कार्यक्रम होणार आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराशी या सत्कार सोहळ्याचा काही संबंध आहे का, असा थेट प्रश्न विचारला असता मेटे यांनी ही शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंबंधीचा कायदा आणल्याने हे शक्य झाले. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.’

आघाडी सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याची सुनावणी जानेवारीलाच होणार आहे. त्याचा निकाल येण्याची वाट पाहता फडणवीस यांच्या सत्काराची घाई कशाला, असे विचारता मेटे म्हणाले, "फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदाच केला आहे. या कायद्यालादेखील कोणी आव्हान दिले तर त्याला कसे तोंड द्यायचे यासंदर्भात आम्ही सरकारसोबत चर्चा करु.’