आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रभावना, शौर्याची समाजाला गरज : सीएम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - “समाजातील राष्ट्रीय भावना आणि शौर्य जेव्हा जेव्हा कमी होते तेव्हा तेव्हा राष्ट्र विघातक शक्ती डोके वर काढतात. आज देशापुढे जी निर्माण झाली त्याचे कारणच हे आहे. म्हणूनच समाजातील शौर्य आणि राष्ट्रभावना टिकली पाहिजे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

थोरले बाजीराव प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची ३१६ वी जयंती गुरुवारी पुण्यात साजरी झाली. यानिमित्त भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा यांना “थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एयर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले आदी या वेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, “समाज गुलामीच्या ग्लानीत होता. मोगलांचे मांडलीक होण्यात धन्यता मानत होता; त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता मोडून काढली. स्वातंत्र्याची भावना सर्वसामान्यांमध्ये जागृत करत महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले; त्याचा विकास थोरल्या बाजीरावांनी केला.

छत्रपती शाहू महाराजांकडे २० वर्षांच्या तरुणाला ‘पेशवा’ बनवण्याचे द्रष्टेपण होते. शाहू महाराजांचा विश्वास बाजीरावांनी सार्थ ठरवला. वेगवान चाल आणि धक्कातंत्र हे त्यांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य होते. वीस वर्षांमध्ये ४१ म्हणजे दर सहा महिन्याला एक अशा लढाया लढून बाजीरावांनी त्या सर्व जिंकल्या. मराठ्यांचे साम्राज्य त्यांनी अटकेपार नेले. दरम्यान, या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

हा माझा सन्मान
देशाचा महान योद्धा बाजीराव यांच्या नावाने पुरस्कार देऊन माझा सन्मान झाला हे माझे भाग्य आहे. हा केवळ माझा गौरव नसून भारतीय सैन्य दलाचा आहे. मी नम्रतेने या पुरस्काराचा स्वीकार करतो.” - राकेश शर्मा.
बातम्या आणखी आहेत...