आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhanajay Desai News In Marathi, Hindu Rashtra Sena

धनंजय देसाईच्या आदेशावरून पुण्यात मोहसीन शेखचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याच्या आदेशानुसारच आयटी अभियंता मोहसीन सादिक शेख याची हत्या झाल्याचा जबाब पोलिसांनी बुधवारी न्यायालयात दिला. याप्रकरणी देसाई (वय 34) याच्यासह अभिषेक सयाजी चव्हाण (28) व महेश मारुती खोत (24) यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

सोशल मीडियावर महापुरुषांची बदनामी करणारे पोस्ट टाकल्यानंतर राज्यभर तणाव निर्माण झाला होता. याच कारणावरून 2 जून रोजी हडपसर येथे मोहसीन शेख याला एका टोळक्याने मारहाण केली होती. त्यात गंभीर जखमी झाल्याने शेख याचा मृत्यू झाला. पोलिसांनी देसाईसह 23 आरोपींना अटक केली आहे.

सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी न्यायालयात सांगितले की, देसाई याने 19 जानेवारी रोजी हडपसर येथे भडक वक्तव्ये केली. आरोपींनी हडपसर येथे एक तारखेला बैठक घेऊन या प्रकरणात काहीतरी करायचे असे ठरवले होते. त्यानंतर दोन तारखेला शेख याची हत्या झाली.